Tamil Nadu Premier League : भारताला मिळाला मलिंगा! एकच डोळा असून टाकतो बुमराहसारखा यॉर्कर

सध्या सुरु असलेल्या तामिळनाडू प्रीमिअर लीगमध्ये एक गोलंदाज त्याच्या स्लिंगा अ‍ॅक्शनमुळं चर्चेत आला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 29, 2019 11:34 AM IST

Tamil Nadu Premier League : भारताला मिळाला मलिंगा! एकच डोळा असून टाकतो बुमराहसारखा यॉर्कर

चेपॉक, 29 जुलै : स्थानिक क्रिकेटमधून खरे हिरे मिळतात हे अगदी तंतोतंत खरे आहे. भारतीय संघात असलेले अनेक खेळाडू हे त्यांच्या प्रथम श्रेणीत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर संघात आहेत. असाच एका हिऱ्याची तामिळनाडूमध्ये होत असलेल्या स्पर्धेत चर्चा होत आहे. तामिळनाडू प्रीमिअर लीगमध्येही अशाच एका गोलंदाजाच्या बॉलिंग अ‍ॅक्शननची तुफान चर्चा होत आहे. हा गोलंदाज आहे जी पेरियास्वामी. त्याची गोलंदाजी पाहून तुम्हाला श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज लसीथ मलिंगा आणि भारताचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराह यांची आठवण येईल.

तामिळनाडू प्रीमिअर लीगमध्ये पेरियास्‍वामी चेपॉक सुपर गिल्‍लीजकडून खेळतो. या हंगामात डिंडीगुल ड्रेगन्‍स विरोधात तो पहिल्यांदाच मैदानात उतरला. 25 वर्षांचा हा गोलंदाज बुमराहप्रमाणे पंचांच्या जवळून गोलंदाजी करतो. त्यामुळे फलंदाजांना चेंडूचा अंदाज घेणे कठीण जाते. पेरियास्‍वामी 135-140 प्रतितास किमी गतीने गोलंदाजी करतो, त्यामुळे फलंदाजांची तारांबळ उडते. महत्वाची गोष्ट म्हणजे पेरियास्वामी एका डोळ्याने पाहू शकत नाही, तरी त्याची गोलंदाजी अव्वल ठरत आहे.

वाचा- T20 Blast : धोनीपेक्षाही चतुर निघाला 'हा' विकेटकीपर, VIDEO पाहून व्हाल हैराण!

वाचा-दारूच्या नशेत 'या' दिग्गज फलंदाजानं केल्या होत्या झंझावती 150 धावा!

या हंगामात पेरियास्वामीने आतापर्यंत 4 सामन्यात 7 विकेट घेतल्या आहेत. त्याने केवळ 5.73च्या इकॉनॉमीने धावा दिल्या आहेत. त्याच्या बॉलिंग अ‍ॅक्शनचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याची गोलंदाजी पाहता त्याच्यासाठी लवकरच भारतीय संघाचे दरवाजे उघडतील.

वाचा-वर्ल्ड चॅम्पियनशीपआधी मेरी कोमचा गोल्डन पंच!

पुण्यात तब्बल 64 हजारांच्या बनावट नोटा जप्त; यासोबत इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 29, 2019 11:07 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...