अश्विननं 'मिस्ट्री बॉल'वर घेतली विकेट, VIDEO पाहून तुम्हीही व्हाल हैराण

भारतीय संघाचा ऑफ स्पिनर आर अश्विन आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून लांब असल्यामुळं सध्या तमिळनाडू प्रीमिअर लीग खेळत आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 23, 2019 02:26 PM IST

अश्विननं 'मिस्ट्री बॉल'वर घेतली विकेट, VIDEO पाहून तुम्हीही व्हाल हैराण

नवी दिल्ली, 23 जुलै : भारतीय संघाचा ऑफ स्पिनर आर अश्विन आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून लांब असल्यामुळं सध्या तमिळनाडू प्रीमिअर लीग खेळत आहे. डिंडीगूल ड्रॅगन्स संघाचे कर्णधारपद हे अश्विनकडे आहे आणि सोमवारी झालेल्या लढतीत त्यांनी गतविजेत्या मधुराई पँथर्सवर 30 धावांनी विजय मिळवला. सामन्याच्या अखेरच्या षटकात त्यानं या मिस्ट्री बॉलने गोलंदाजी केली. या गोलंदाजीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

डिंडीगूल ड्रॅगन्सकडून गोलंदाजी करताना अश्विननं 4 ओव्हरमध्ये 16 धावा देत 3 विकेट घेतल्या. डिंडीगूल ड्रॅगन्स आणि मधुराई पँथर्सवर यांच्यात झालेल्या सामन्यात मधुराई पँथर्सवरला अखेरच्या षटकात 32 धावांची गरज असताना कर्णधार अश्विननं गोलंदाजी केली. त्यानं पहिल्याच चेंडूवर अभिषेक तन्वरला बाद केले. ओव्हरच्या अखेरच्या दोन चेंडूवर अश्विननं रहस्यमय शैलीत गोलंदाजी केली. हा चेंडू पाहून फलंदाज आणि अश्विनचे सहकारीही हैरान झाले. फलंदाज किरण आकाशनं चकीत झात चेंडू सीमारेषेच्या दिशेनं टोलवला. पण, त्याला झेलबाद होऊन माघारी परतावे लागले.

<

वाचा-INDvsWI : भारताविरुद्ध मालिकेसाठी विंडीजचा संघ जाहीर

Loading...

याआधी आयपीएलमध्ये अश्विननं वादग्रस्त प्रकारे फलंदाजाला बाद केले होते. त्यामुळं आता त्याची गोलंदाजी पाहून चाहते हैराण झाले आहेत. दरम्यान, मधुराई पँथर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

वाचा-वेस्ट इंडिज दौऱ्यात भारताच्या 'या' सात रत्नांची हुकली संधी!

डिंडीगूल ड्रॅगन्स संघानं 6 विकेट गमावत 182 धावा केल्या. त्यानंतर मधुराई पँथर्सनं 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावत केवळ 152 धावा केल्या. या सामन्यात एन जगदीशन आणि हरी निशांथ यांनी 13.2 षटकांत 104 धावांची सलामी दिली. जगदीशनने नाबाद 87 धावा करत सामनावीराचा पुरस्कार आपल्या नावावर केला. टीएनपीएलमध्ये अश्विनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या डिंडीगूल ड्रॅगन्सचा हा सलग दुसरा विजय आहे.

वाचा-वेस्ट इंडिज दौऱ्यात भारताच्या 'या' सात रत्नांची हुकली संधी!

वाचा-World Cup मध्ये शमी-जडेजा यांच्यामुळे रोहित-विराटचं बिनसलं?

VIDEO: कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची तयारी पूर्ण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: r ashwin
First Published: Jul 23, 2019 02:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...