Home /News /sport /

Afghanistan क्रिकेटचा टेस्ट दर्जा जाणार, Taliban च्या एका निर्णयामुळे धक्का

Afghanistan क्रिकेटचा टेस्ट दर्जा जाणार, Taliban च्या एका निर्णयामुळे धक्का

अफगाणिस्तानवर तालिबानने (Taliban Captures Afghanistan) कब्जा केल्यापासूनच तिथली परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. बुधवारी तालिबानने अफगाणिस्तानच्या महिलांना (Afghanistan Women’s Cricket Team) कोणत्याही प्रकारचा खेळ खेळण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 8 सप्टेंबर : अफगाणिस्तानवर तालिबानने (Taliban Captures Afghanistan) कब्जा केल्यापासूनच तिथली परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. बुधवारी तालिबानने अफगाणिस्तानच्या महिलांना (Afghanistan Women’s Cricket Team) कोणत्याही प्रकारचा खेळ खेळण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. तालिबानच्या संस्कृती आयोगाचे उपाध्यक्ष अहमदुल्लाह वसीक यांनी याची घोषणा केली आहे. अफगाणिस्तानच्या महिला कोणताही खेळ खेळू शकणार नाहीत, यामध्ये क्रिकेटचाही समावेश आहे, असं अहमदुल्लाह वसीक म्हणाले. 'मला वाटत नाही महिलांना क्रिकेट खेळायला मंजुरी दिली जाईल. क्रिकेटमध्ये अनेकवेळा महिलांचा चेहरा आणि शरीर झाकलेलं नसतं. इस्लाम महिलांना याची परवानगी देत नाही,' असं तालिबानी नेते अहमदुल्लाह वसीक यांनी सांगितलं. अफगाणिस्तान्या महिला टीमवर क्रिकेट खेळण्यासाठी बंदी घातल्यानंतर, त्यांच्या पुरुष टीमचा टेस्ट टीमचा दर्जाही जाणार आहे. आयसीसीच्या नियमांनुसार ज्या देशाच्या महिला आणि पुरुष टीम खेळतात त्यांनाच टेस्ट टीमचा दर्जा देण्यात येतो. महिला टीममध्ये 12 सदस्य असणं गरजेचं असतं आणि अफगाणिस्तानने 2017 साली ही अट पूर्ण केली. मागच्याच वर्षी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने 25 महिला क्रिकेटपटूंना करारबद्धही केलं होतं. अफगाणिस्तानच्या टीमला 27 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक टेस्ट मॅच खेळायची आहे, पण तालिबानच्या या निर्णयामुळे त्यांचा टेस्ट दर्जा हिरावला जाणार आहे. अफगाणिस्तानची राष्ट्रीय महिला क्रिकेट टीम 11 वर्षांपूर्वी 2010 साली तयार करण्यात आली होती. सुरुवातीला याचा विरोधही करण्यात आला. क्रिकेट बोर्डानेही सुरुवातीला तालिबानला घाबरून याचा विरोध केला. 2012 साली अफगाणिस्तानची महिला टीम तझाकिस्तानमध्ये 6 टीमची स्पर्धा खेळण्यासाठी गेली, तिकडे त्यांचा विजय झाला. अफगाणिस्तान महिला टीममधल्या टॅलेंटमुळे बोर्डाने त्यांच्याशी मागच्याच वर्षी करार केला, पण आता तालिबानची सत्ता आल्यानंतर त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवलं गेलं आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Afghanistan, Cricket, Taliban

    पुढील बातम्या