सुवर्णपदक विजेता तेजिंदरपालच्या वडिलांचा मृत्यू, अपूर्ण राहिलं पदक दाखवण्याचं स्वप्न

तेजिंदरच्या वडिलांना मुलाने देशासाठी मिळवलेलं सूवर्णपदक आपल्या हातात घ्यायचं होतं

News18 Lokmat | Updated On: Sep 4, 2018 10:39 AM IST

सुवर्णपदक विजेता तेजिंदरपालच्या वडिलांचा मृत्यू, अपूर्ण राहिलं पदक दाखवण्याचं स्वप्न

नवी दिल्ली, ०२ सप्टेंबर- आशियाई खेळात शॉटपूट खेळामध्ये देशाला सुवर्णपदक मिळवून देणारा तेजिंदर पाल सिंहच्या वडिलांचे कर्म सिंह यांचे कर्करोगाने निधन झाले. आपल्या वडिलांना देशासाठी मिळवलेलं पहिलं सुवर्णपदक दाखवण्याची तेजिंदरची इच्छा होती. तेजिंदर मंगळवारी सकाळी भारतात पोहोचला मात्र सोमवारी रात्रीच वडिलांनी अखेरचा श्वास घेतला. बाबांना आपलं पदक दाखवण्याची तेजिंदरची ही इच्छा कायमची अपूरी राहिली. अवघ्या काही तासांनी तेजिंदरचं आयुष्य बदलून गेलं.

काही दिवसांपूर्वी ज्या घरात तेजिंदरच्या विजयाचा आनंद साजरा केल जात होता त्याच घरावर आज दुःखाचा डोंगर कोसळला. गेल्या दोन वर्षांपासून तेजिंदरचे वडील कर्करोगाशी झुंज देत होते. तेजिंदरने देशासाठी खेळावं यासाठी त्याच्या वडिलांनी अनेक तडजोडी केल्या. आपल्या वडिलांच्या या परिश्रमाचं झालेलं चीज त्याला दाखवायचं होतं. मात्र विध्यात्याच्या मनात काही तरी वेगळंच होतं.

सोमवारी संध्याकाळी दिल्ली विमानतळावर उतरल्यावर तेजिंदरने लगेच त्याच्या घरी मोगाला जाण्याचा निर्णय घेतला. आपल्या घरापासून काही तासांवर असतानाच त्याला वडिलांच्या निधनाची बातमी कळली. तेजिंदरच्या वडिलांना मुलाने देशासाठी मिळवलेलं सूवर्णपदक आपल्या हातात घ्यायचं होतं. मात्र ही त्यांची शेवटची इच्छा तेजिंदर पूर्ण करू शकला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 4, 2018 10:39 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...