भारताचा डबल धमाका! Commonwealth Table Tennis Championships मध्ये महिला आणि पुरुष संघाला विजेतेपद

भारताचा डबल धमाका! Commonwealth Table Tennis Championships मध्ये महिला आणि पुरुष संघाला विजेतेपद

भारताच्या महिला आणि पुरुष संघांने कॉमनवेल्थ टेबल टेनिस चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपद पटकावलं. पुरुष संघाचं हे सलग दुसरं विजेतेपद ठरलं.

  • Share this:

कटक, 20 जुलै : कॉमनवेल्थ टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष संघांनी जबरदस्त कामगिरी करत विजेतेपद पटकावलं. शुक्रवारी झालेल्या अंतिम सामन्यात महिला संघानं इंग्लंडवर 3-0 ने विजय मिळवला. तर पुरुषांच्या संघाने इंग्लंडला 3-2 ने पराभूत करत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं.

महिला संघाने सेमीफायनलमध्ये सिंगापूरला 3-0 ने पराभूत करून अंतिम फेरीत धडक मारली होती. सलग आठवेळा विजेतेपद पटकावण्याची कामगिरी सिंगापूरच्या महिला संघाने केली होती. या संघाने 1997 पासून ही स्पर्धा जिंकली होती. त्यांना भारतीय महिलांनी सेमीफायनलमध्ये पराभूत केलं होतं.

दुसरीकडे भारतीय पुरुष संगाने 2015 मध्ये भारतात झालेल्या स्पर्धेत विजय मिळवला होता. भारताने पहिल्यांदा 2004 मध्ये विजेतेप पटकावलं होतं. त्यानंतर दहा वर्षांनी विजेतेपदावर नाव कोरलं होतं. आता सलग दुसऱ्यांदा भारताने गी कामगिरी केली.

अंतिम सामन्यात भारताच्या महिला संघातील अर्चना कामतने टिनटिवर मात करत आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर मनिका बत्राने डेनिस पायेटला आणि मधुरिका पाटकरनं एमिली बाल्टनला पराभूत केलं. तर पुरुष संघात हमीत देसाईने भारताचं विजेतेपद फक्त वाचवलं नाही तर मिळवून दिलं. अचंत शरत कमल आणि जी. साथियान यांच्या पराभवामुळे भारत पिछाडीवर पडला होता. तेव्हा हरमीतने डेव्हिड मॅकबेथला पराभूत करून सामन्यात पुनरागमन केलं. त्यानंतर साथियान आणि अचंतने पुढचे सामने जिंकून 3-2 ने विजय मिळवला.

पंत-शंकरची जागा कोणी घ्यायला हवी? मांजरेकरांनी सुचवला पर्याय

सचिनप्रमाणेच धोनीने करायला हवं, माजी निवड समिती सदस्यांचा सल्ला

काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांचा हॉस्पिटलमध्ये राडा; पोलिसांवर भडकल्या, पाहा VIDEO

First Published: Jul 20, 2019 01:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading