• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • दिवाळीआधीच फटाके फुटणार! T20 World Cup च्या तारखांची घोषणा

दिवाळीआधीच फटाके फुटणार! T20 World Cup च्या तारखांची घोषणा

आयसीसीने टी-20 वर्ल्ड कपच्या (ICC T20 World Cup) आयोजनाबाबत अधिकृत घोषणा केली आहे. या स्पर्धेचं आयोजन युएईशिवाय (UAE) ओमानमध्येही (Oman) होणार आहे.

 • Share this:
  दुबई, 29 जून : आयसीसीने टी-20 वर्ल्ड कपच्या (ICC T20 World Cup) आयोजनाबाबत अधिकृत घोषणा केली आहे. या स्पर्धेचं आयोजन युएईशिवाय (UAE) ओमानमध्येही (Oman) होणार आहे. कोरोना व्हायरसमुळे बीसीसीआयने (BCCI) एकाच दिवसापूर्वी वर्ल्ड कपचं भारतात आयोजन होणार नाही, असं स्पष्ट केलं होतं. टी-20 वर्ल्ड कपची सुरुवात 17 ऑक्टोबरला होईल, तर फायनल 14 नोव्हेंबरला खेळवली जाईल. टी-20 वर्ल्ड कपआधी आयपीएलच्या (IPL 2021) उरलेल्या 31 सामन्यांचं आयोजन युएईमध्येच होणार आहे. ही स्पर्धा युएईमध्ये खेळवण्यात येणार असली, तरी स्पर्धेचं आयोजन बीसीसीआयकडेच असणार आहे. आयसीसीने प्रसिद्धी पत्रक काढून सांगितलं की वर्ल्ड कप दुबई, शारजाह, अबुधाबी शिवाय ओमानमध्येही होईल. या स्पर्धेत एकूण 16 टीम खेळणार आहेत. क्वालिफायर राऊंडमध्ये 8 टीमना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आलं आहे. एका ग्रुपचे सामने युएईमध्ये तर दुसऱ्यांचे सामने ओमानमध्ये होतील. दोन्ही ग्रुपच्या टॉप-2 टीम सुपर-12 मध्ये प्रवेश करतील. 2016 नंतर पहिल्यांदाच टी-20 वर्ल्ड कपचं आयोजन होणार आहे. मागच्यावेळी झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजने इंग्लंडचा पराभव केला होता. क्वालिफायर राऊंडमध्ये बांगलादेश, श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड्स, स्कॉटलंड, नामिबिया, ओमान आणि पापुआ न्यू गिनी या टीम खेळणार आहेत. भारतामध्ये वर्ल्ड कपचं आयोजन होत नसल्यामुळे आम्ही निराश आहोत, पण स्पर्धेसाठी सुरक्षितता महत्त्वाची होती, असं आयसीसीने सांगितलं.
  Published by:Shreyas
  First published: