मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup : धवन टीममध्ये का नाही? निवड समिती अध्यक्षांचं उत्तर ऐकून विश्वास बसणार नाही

T20 World Cup : धवन टीममध्ये का नाही? निवड समिती अध्यक्षांचं उत्तर ऐकून विश्वास बसणार नाही

टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची (T20 World Cup Team India) घोषणा बुधवारी करण्यात आली. 15 सदस्यांच्या या टीममध्ये शिखर धवनला संधी देण्यात आली नाही. निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा (Chetan Sharma) यांनी शिखर धवन (Shikhar Dhawan) टीममध्ये नसल्याबाबत धक्कादायक कारण सांगितलं.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 9 सप्टेंबर : टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची (T20 World Cup Team India) घोषणा बुधवारी करण्यात आली. 15 सदस्यांच्या या टीममध्ये शिखर धवनला संधी देण्यात आली नाही. निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा (Chetan Sharma) यांनी शिखर धवन (Shikhar Dhawan) टीममध्ये नसल्याबाबत धक्कादायक कारण सांगितलं. चेतन शर्मा यांनी सांगितलेल्या या कारणावर नक्की विश्वास ठेवायचा का नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिखर धवन मर्यादित ओव्हरचा महत्त्वाचा खेळाडू आहे, पण त्याला आराम द्यायची गरज होती, असं चेतन शर्मा म्हणाले. वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धेसाठी तुम्ही ज्याला महत्त्वाचा खेळाडू मानता, त्याला आराम कसा दिला जाऊ शकतो? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

'शिखर धवन आमच्यासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. तो श्रीलंका दौऱ्यावर कर्णधार होता. जी चर्चा झाली ती मी सांगू शकत नाही. तो महत्त्वपूर्ण आहे. सध्या दुसऱ्या खेळाडूंना संधी द्यायची आणि धवनला आरामाची गरज आहे. तो लवकरच पुनरागमन करेल,' असं चेतन शर्मा म्हणाले.

'आमच्याकडे रोहित शर्मा, केएल राहुल आणि इशान किशन आहे. किशन ओपनिंग किंवा मधल्या फळीतही खेळू शकतो. त्याच्यामुळे आमच्यासमोरचा पर्याय वाढला आहे. तसंच विराट आणि रोहितही ओपनिंगला खेळू शकतात, पण याचा निर्णय टीम मॅनेजमेंट घेईल,' अशी प्रतिक्रिया चेतन शर्मांनी दिली.

'आमच्याकडे विकेट कीपर म्हणून ऋषभ पंत, इशान किशन आणि केएल राहुलहे तीन पर्याय आहेत. पण पंत पहिल्या क्रमांकाची पसंती आहे, त्यानंतर इशान किशन आणि आणीबाणीची परिस्थिती आली तर राहुलचा विकेट कीपर म्हणून विचार होईल,' असं चेतन शर्मांनी सांगितलं.

'युएईच्या खेळपट्टीवर अश्विन उपयोगी ठरेल. आम्हाला टीममध्ये एक ऑफ स्पिनर हवा होता. आयपीएलमध्ये अश्विनची बॉलिंग आपण सगळ्यांनी बघितली आहे. ऑलराऊंडर म्हणून जडेजा, हार्दिक आणि अक्षर पटेल हे तीन पर्याय आहे. खेळपट्टी स्पिन होणारी असेल तर अक्षर आणि जडेजा आहेत. युझवेंद्र चहलबाबत चर्चा झाली, पण आम्हाला वाटलं जलद बॉल टाकणाऱ्या लेग स्पिनरची गरज आहे, त्यामुळे चहलऐवजी राहुल चहरला निवडण्यात आलं,' असं चेतन शर्मा म्हणाले.

भारतीय टीम

विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर. अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी

राखीव खेळाडू : श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर

First published:

Tags: Shikhar dhawan, T20 world cup, Team india