दुबई, 20 ऑक्टोबर: टी20 वर्ल्डकपला (T20 World Cup) सुरुवात झाली असून तत्पूर्वी सराव सामने (warm up match)खेळवण्यात येत आहेत. दरम्यान, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने(Australia) काल ट्विट करत ऑस्ट्रलियाचा संघ यंदा टी20 वर्ल्डकपमध्ये दोन दोन वेगवेगळ्या जर्सीत दिसणार असल्याचे जाहिर केले. त्यानंतर क्रिकेट जगतात अनेकांच्या मनात क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे ट्विट पाहूर सवाल उपस्थित होऊ लागला. तर यामागचे कारण समोर आले असून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दोन जर्सीसंदर्भात मोठा खुलासा केला आहे.
मेलबर्न क्रिकेट मैदानापासून प्रेरित असिक्स किट ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना आवडली, पण आयसीसीच्या मते पापुआ न्यू गिनी, स्कॉटलंड आणि नामिबियाच्या संघांच्या जर्सीही त्या सारख्याच आहेत. अशा स्थितीत जर या संघांविरुद्ध खेळणार असेल तर क्रिकेट ऑस्ट्रेलियाला दुसरी जर्सी डिझाईन करण्याच्या सूचना देण्यात आली होती. आयसीसीने ऑस्ट्रेलिया संघाला पर्यायी जर्सी घेऊन मैदानात उतरण्यास सांगितले.
पण असोसिएट देशांकडे नवीन जर्सी डिझाइन करण्यासाठी पुरेसा निधी नसल्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 2019 च्या वनडे वर्ल्डकपदरम्यान घातलेली जर्सी पर्यायी जर्सी म्हणून वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
Australia will play in two different kits at the #T20WorldCup, including the design that @AusWomenCricket won with at the 2020 edition of the tournament. pic.twitter.com/yozBGpZJ35
— cricket.com.au (@cricketcomau) October 19, 2021
आयसीसीने ऑस्ट्रेलिया संघाला 23 ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलामीच्या सामन्यादरम्यान पिवळी जर्सी घालायला सांगितली आहे. भारताविरुद्धच्या सराव सामन्यासह उर्वरित सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया संघ त्यांच्या पसंतीची काळी आणि सोनेरी रंगाची जर्सी परिधान करेल. अशी माहिती समोर आली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या संघाने पहिल्या सराव सामन्यात चमकदार कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलिया संघाने न्यूझीलंड संघाचा पराभव केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Australia, Cricket news, T20 cricket, T20 world cup