मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup : भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळायला नकार दिला तर... काय आहे ICC चा नियम?

T20 World Cup : भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळायला नकार दिला तर... काय आहे ICC चा नियम?

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) रविवार 24 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात सामना होणार आहे, पण जम्मू-काश्मीरमध्ये होत असलेले दहशतवादी (Jammu Kashimr Terrorist Attack) हल्ले बघता ही मॅच रद्द करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) रविवार 24 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात सामना होणार आहे, पण जम्मू-काश्मीरमध्ये होत असलेले दहशतवादी (Jammu Kashimr Terrorist Attack) हल्ले बघता ही मॅच रद्द करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) रविवार 24 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात सामना होणार आहे, पण जम्मू-काश्मीरमध्ये होत असलेले दहशतवादी (Jammu Kashimr Terrorist Attack) हल्ले बघता ही मॅच रद्द करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

दुबई, 19 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) रविवार 24 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात सामना होणार आहे, पण जम्मू-काश्मीरमध्ये होत असलेले दहशतवादी (Jammu Kashmir Terrorist Attack) हल्ले बघता ही मॅच रद्द करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. भारत-पाकिस्तान यांच्यात कोणताही सामना होऊ नये, असं केंद्रीय मंत्री गिरीराज सिंग (Giriraj Singh) आणि रामदास आठवले (Ramdas Athawale) म्हणाले आहेत. सीमेवर जवान शहीद होत असताना भारत पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे, असं वक्तव्य असदुद्दीन ओवेसी यांनी केलं आहे.

सोशल मीडियावरही #BoycottPakistan हा हॅशटॅग ट्रेंड वर आहे. बीसीसीआयने (BCCI) मात्र मॅच रद्द करता येणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. 'काश्मीरमध्ये घडणाऱ्या हत्या दुःखद आहेत, आम्ही त्याचा निषेध करतो. जो भारत-पाकिस्तान सामन्याचा प्रश्न आहे, तो आयसीसीच्या (ICC) आंतरराष्ट्रीय कराराअंतर्गत आहे, ज्यामध्ये आम्ही कोणत्याही देशासोबत खेळण्यास नकार देऊ शकत नाही. आयसीसी स्पर्धा खेळाव्या लागतील', असं बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले.

भारताने जर पाकिस्तानविरुद्धचा सामना रद्द करायला सांगितला तर त्याचे काय परिणाम होतील, तसंच आयसीसीचा नियम काय सांगतो, याविषयी आपण जाणून घेऊया.

भारताच्या अडचणी वाढणार

जर दहशतवादी घटनांमुळे भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला तर यामुळे भारताचंच नुकसान होईल. भारताने माघार घेतल्यामुळे पाकिस्तानला दोन पॉईंट्स मिळतील, तसंच भारताला एकही अंक मिळणार नाही. दोन पॉईंट्स मिळाल्यामुळे पाकिस्तानला सेमी फायनलमध्ये पोहोचणं सोपं होईल. दुसरीकडे भारतासाठी सेमी फायनलचा प्रवेश आणखी कठीण होऊन बसेल.

टेस्ट चॅम्पियनशीपमध्येही नकार

भारताने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्येही पाकिस्तानविरुद्ध खेळायला नकार दिला होता. याबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही अनेकवेळा आयसीसीकडे तक्रार केली होती, पण बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने सीरिज खेळायला नकार दिला.

टी-20 वर्ल्ड कपमध्ये मात्र आयसीसी भारत-पाकिस्तान सामना होऊ देणार नाही, असं होणार नाही, कारण या सामन्यामधून आयसीसीला सर्वाधिक महसूल मिळतो. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड भारत आमच्याविरुद्ध खेळत नसल्याबद्दल वारंवार आयसीसीला तक्रार करते. यावेळी भारताने खेळायला नकार दिला तर आयसीसी भारतीय टीमवर बंदीही आणू शकते. तसंच टीम इंडियाला मोठा दंडही होऊ शकतो.

मग फायनलला काय करणार?

जर 24 ऑक्टोबरच्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला तर टीम इंडियाला 2 पॉईंट्स मिळणार नाहीत, पण जर भारताने उरलेल्या सगळ्या सामन्यांमध्ये विजय मिळवला आणि फायनलमध्ये पुन्हा पाकिस्तानची टीमच समोर आली तर टीम इंडिया काय करणार? पहिल्या सामन्यावेळचीच भूमिका जर फायनलवेळीही ठेवली तर वर्ल्ड कप पाकिस्तानला दिला जाईल.

2019 वर्ल्ड कपवेळीही मागणी

भारत-पाकिस्तान यांच्यात याआधी 2019 वर्ल्ड कपचा सामना झाला होता. त्यावेळीही मॅच रद्द करण्याची मागणी होत होती, पण सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने मात्र असं होऊ नये, अशी प्रतिक्रिया दिली होती. मैदानात उतरून पाकिस्तानविरुद्ध 2 पॉईंट्स घेतले पाहिजेत, त्यांना फुकटचे 2 पॉईंट्स गिफ्ट देण्यात काहीच अर्थ नाही, असं सचिन म्हणाला होता.

2008 साली मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानचा दौरा केला नाही. या दोन्ही टीममध्ये अखेरची सीरिज 2012 साली भारतात झाली होती.

First published:

Tags: BCCI, Icc, India vs Pakistan, T20 world cup