मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup : सुपरमॅनपेक्षाही सुपर, वेस्ट इंडिजच्या हुसेनने पकडला भन्नाट कॅच, VIDEO

T20 World Cup : सुपरमॅनपेक्षाही सुपर, वेस्ट इंडिजच्या हुसेनने पकडला भन्नाट कॅच, VIDEO

सर्वाधिक दोन वेळा टी-20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची यंदाच्या स्पर्धेतली सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यामध्ये वेस्ट इंडिजचा (West Indies vs England) फक्त 55 रनवर ऑल आऊट झाला.

  • Published by:  Shreyas

दुबई, 23 ऑक्टोबर : सर्वाधिक दोन वेळा टी-20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची यंदाच्या स्पर्धेतली सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यामध्ये वेस्ट इंडिजचा (West Indies vs England) फक्त 55 रनवर ऑल आऊट झाला. टी-20 वर्ल्ड कप इतिहासातला वेस्ट इंडिजचा हा निच्चांकी स्कोअर आहे. क्रिस गेल वगळता वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या कोणत्याही खेळाडूला दोन अंकी धावसंख्या करता आली नाही.

वेस्ट इंडिजने दिलेलं 56 रनचं आव्हान इंग्लंडने 8.2 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. हे करताना इंग्लंडने 4 विकेट गमावल्या. जॉस बटलर (Jos Buttler) 22 बॉलमध्ये 24 रनवर नाबाद राहिला. वेस्ट इंडिजकडून अकील हुसेनने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या, तर रवी रामपॉलला एक विकेट मिळाली.

अकील हुसेनने या (Akeal Hosein Catch) सामन्यात आपल्याच बॉलिंगवर भन्नाट कॅच पकडला. सातव्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलला अकील हुसनने लियाम लिव्हिंस्टोनची (Liam Livingstone) विकेट घेतली. हुसनने टाकलेला बॉल लिव्हिंस्टोनने मिड ऑफच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला, पण हुसेनने सुपरमॅनसारखी उडी मारत कॅच पकडला. हुसनने कॅच पकडल्यानंतर मैदानातल्या दोन्ही अंपायरनी थर्ड अंपायरकडे जायचा निर्णय घेतला. मैदानातल्या अंपायरनी लिव्हिंस्टोन आऊट असल्याचा सॉफ्ट सिग्नल दिला. यानंतर थर्ड अंपायरनेही लिव्हिंस्टोनला आऊट दिलं.

अकील हुसेन हा सुरुवातीला वेस्ट इंडिजच्या टीममध्ये नव्हता. राखीव खेळाडू म्हणून हुसेनची निवड करण्यात आली होती, पण फॅबियन एलनला दुखापत झाल्यामुळे अकील हुसेनला वेस्ट इंडिजच्या टीममध्ये अखेरच्या क्षणी जागा मिळाली.

वेस्ट इंडिजची टीम टी-20 वर्ल्ड कपच्या पहिल्या ग्रुपमध्ये आहे. हा ग्रुप म्हणजे ग्रुप ऑफ डेथ असल्याचंही बोललं जातं. वेस्ट इंडिज आणि इंग्लंडसह या ग्रुपमध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि बांगलादेशच्या टीम आहेत. या ग्रुपमधल्या टॉप-2 टीम सेमी फायनलमध्ये प्रवेश करणार आहेत.

First published:

Tags: England, T20 world cup, West indies