मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup : लिएंडल सिमन्सची 'कछुवा छाप' बॅटिंग, वर्ल्ड कप इतिहासातली संथ खेळी

T20 World Cup : लिएंडल सिमन्सची 'कछुवा छाप' बॅटिंग, वर्ल्ड कप इतिहासातली संथ खेळी

टी-20 क्रिकेट म्हणजे वेस्ट इंडिजचे (West Indies) खेळाडू, असं समीकरण आतापर्यंत जोडलं जातं, पण यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) मात्र वेस्ट इंडिजच्या टीमने निराशा केली आहे.

  • Published by:  Shreyas

दुबई, 27 ऑक्टोबर : टी-20 क्रिकेट म्हणजे वेस्ट इंडिजचे (West Indies) खेळाडू, असं समीकरण आतापर्यंत जोडलं जातं, पण यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) मात्र वेस्ट इंडिजच्या टीमने निराशा केली आहे. स्पर्धेच्या पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजला पराभवाचा धक्का बसला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (West Indies vs South Africa) मंगळवारी झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजच्या लिएंडल सिमन्सने (Lendl Simmons) अतिशय संथ बॅटिंग केली. 14 वर्षांमध्ये पहिल्यांदाच एखाद्या खेळाडूने एवढी स्लो बॅटिंग केली आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये 30 पेक्षा जास्त बॉल खेळून सगळ्यात कमी स्ट्राईक रेटने बॅटिंग करण्याचं रेकॉर्ड बांगलादेशच्या अलोक कपालीच्या नावावर आहे. त्याने 2007 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 40 च्या स्ट्राईक रेटने 35 बॉलमध्ये 14 रन केले होते. आता 14 वर्षांनी एवढी संथ बॅटिंग पाहायला मिळाली आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ओपनिंगला खेळायला आलेल्या सिमन्सने 35 बॉलमध्ये 16 रन केले. 14 व्या ओव्हरमध्ये सिमन्स आऊट झाला. या खेळीमध्ये त्याला एकही बाऊंड्री लावता आली नाही. सिमन्सने 45.71 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली. सिमन्सच्या या संथ खेळीमुळे वेस्ट इंडिजला 143 रनच करता आले. दक्षिण आफ्रिकेने या आव्हानाचा पाठलाग 2 विकेट गमावून केला. सिमन्सने त्याच्या 16 रन फक्त एक-एक रन काढून केल्या. 35 पैकी 19 बॉलमध्ये त्याला एकही रन काढता आली नाही.

सिमन्सच्या नावावर आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सगळ्यात संथ बॅटिंगच्या विक्रमाचीही नोंद झाली. कमीत कमी 25 बॉलमध्ये सगळ्यात संथ खेळीचा रेकॉर्ड एमएस धोनीच्या (MS Dhoni) नावावर होता. धोनीने 2008 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध 27 बॉलमध्ये 9 रन केले होते. आता हे रेकॉर्ड सिमन्सच्या नावावर झालं आहे. सिमन्सने 35 बॉलचा सामना केला.

लिएंडल सिमन्सने 2016 वर्ल्ड कपमध्ये आक्रमक बॅटिंग करत भारताचं वर्ल्ड कप विजयाचं स्वप्न मोडलं होतं. भारताने वेस्ट इंडिजला विजयासाठी 192 रनचं आव्हान दिलं होतं. यानंतर सिमन्सने 51 बॉलमध्ये 82 रनची खेळी करून वेस्ट इंडिजला विजय मिळवून दिला होता. सिमन्सने त्या खेळीत 5 सिक्स आणि 7 फोर लगावले होते.

First published:

Tags: T20 world cup, West indies