मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup WI vs ENG : चॅम्पियन वेस्ट इंडिजने लाज घालवली, इंग्लंडचा दणदणीत विजय

T20 World Cup WI vs ENG : चॅम्पियन वेस्ट इंडिजने लाज घालवली, इंग्लंडचा दणदणीत विजय

सर्वाधिक दोन वेळा टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) जिंकलेल्या वेस्ट इंडिजने इंग्लंडविरुद्धच्या (West Indies vs England) सामन्यात लाजिरवाणी कामगिरी केली आहे.

  • Published by:  Shreyas

दुबई, 23 ऑक्टोबर : सर्वाधिक दोन वेळा टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) जिंकलेल्या वेस्ट इंडिजने इंग्लंडविरुद्धच्या (West Indies vs England) सामन्यात लाजिरवाणी कामगिरी केली आहे. इंग्लंडने टॉस जिंकून पहिले बॅटिंगला बोलावल्यावर वेस्ट इंडिजचा फक्त 55 रनवर ऑल आऊट झाला. वेस्ट इंडिजच्या या छोट्या आव्हानाचा पाठलाग इंग्लंडने 8.2 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून केला. जॉस बटलर 24 रनवर नाबाद राहिला. वेस्ट इंडिजकडून अकील हुसेनने 2 आणि रवी रामपॉलने एक विकेट घेतली.

वेस्ट इंडिजचा टी-20 वर्ल्ड कपमधला हा निच्चांकी आणि टी-20 मधला दुसरा सगळ्यात कमी स्कोअर आहे. इंग्लंडकडून आदिल रशिदने 2.2 ओव्हरमध्ये फक्त 2 रन देऊन सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर मोईन अली आणि टायमल मिल्सना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. क्रिस वोक्स आणि क्रिस वोक्स यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. वेस्ट इंडिजकडून क्रिस गेलने सर्वाधिक 13 रन केले. गेल वगळता इतर कोणत्याही वेस्ट इंडिजच्या खेळाडूला दोन आकडी धावसंख्याही उभारता आली नाही.

2016 सालच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये फायनल खेळलेले वेस्ट इंडिज आणि इंग्लंड (West Indies vs England) आज 2021 टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) समोरासमोर आल्या. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार इयन मॉर्गनने (Eoin Morgan) टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. याआधी वेस्ट इंडिजच्या टीमने सर्वाधिक दोन वेळा टी-20 वर्ल्ड कप जिंकला आहे. यंदाही वेस्ट इंडिजची टीम वर्ल्ड कप जिंकण्याची प्रबळ दावेदार आहे. तर दुसरीकडे इंग्लंडने मागचा 50 ओव्हरचा वर्ल्ड कप जिंकला आहे.

वेस्ट इंडिज आणि इंग्लंडची टीम पहिल्या ग्रुपमध्ये आहे. हा ग्रुप म्हणजे ग्रुप ऑफ डेथ असल्याचंही समजलं जातंय. कारण या ग्रुपमध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, इंग्लंड, श्रीलंका आणि बांगलादेश या टीम आहेत. या सहापैकी दोन टीम सेमी फायनलमध्ये प्रवेश करणार आहेत.

First published:

Tags: England, T20 world cup, West indies