मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup : भारताच्या पराभवानंतर वसीम-वकारने मर्यादा ओलांडली, Live कार्यक्रमातला संतापजनक VIDEO

T20 World Cup : भारताच्या पराभवानंतर वसीम-वकारने मर्यादा ओलांडली, Live कार्यक्रमातला संतापजनक VIDEO

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाला (Team India) लागोपाठ दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. रविवारी न्यूझीलंडने भारताचा (India vs New Zealand) 8 विकेटने पराभव केला.

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाला (Team India) लागोपाठ दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. रविवारी न्यूझीलंडने भारताचा (India vs New Zealand) 8 विकेटने पराभव केला.

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाला (Team India) लागोपाठ दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. रविवारी न्यूझीलंडने भारताचा (India vs New Zealand) 8 विकेटने पराभव केला.

दुबई, 1 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाला (Team India) लागोपाठ दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. रविवारी न्यूझीलंडने भारताचा (India vs New Zealand) 8 विकेटने पराभव केला. याआधी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात (India vs Pakistan) टीम इंडियाचा 10 विकेटने पराभव झाला होता. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचे दिग्गज बॅट्समन सपशेल अपयशी ठरले. 20 ओव्हरमध्ये टीमने रडत खडत 110 रन केले. किवी टीमने या आव्हानाचा पाठलाग 2 विकेट गमावून पूर्ण केला. या पराभवानंतर टीम इंडियाच्या चाहत्यांची घोर निराशा झाली, तर दुसरीकडे पाकिस्तानमध्ये टीम इंडियाच्या पराभवाचा जल्लोष करण्यात आला.

पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रम (Wasim Akram) आणि वकार युनूस (Waqar Younis) भारताच्या विजयाबाबत खूश दिसले. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाकिस्तानमधल्या टीव्ही चॅनलच्या लाईव्ह कार्यक्रमात वसीम अक्रम नाचत होता, तर वकार युनूस टाळ्या वाजवत होता. या दोघांसोबत वहाब रियाझ आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार मिसबाह उल हक हेदेखील उपस्थित होते. या व्हिडिओमध्ये भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानी खेळाडू खूश झाल्याचं दिसत आहे.

आफ्रिदीने चोळलं जखमेवर मीठ

शाहिद आफ्रिदीनेही या पराभवानंतर टीम इंडियाच्या जखमेवर मीठ चोळलं आहे. 'भारताकडे अजूनही सेमी फायनलमध्ये पोहोचण्याची संधी आहे, पण भारताने पहिल्या दोन सामन्यांमध्ये जशी कामगिरी केली ते पाहून आता चमत्कारच त्यांना सेमी फायनलमध्ये पोहोचवू शकतो,' असं ट्वीट आफ्रिदीने केलं.

‘मैदानावर क्रिकेट खेळणार की इन्स्टाग्रामवर?’; शोएब अख्तरकडून Team India ची कानउघडणी

भारताचं भवितव्य अफगाणिस्तानच्या हाती?

भारत आणि न्यूझीलंडचे उरलेले सामने अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाविरुद्ध आहेत. कागदावर स्कॉटलंड आणि नामबियाच्या टीम दुबळ्या आहेत, तर अफगाणिस्तानमध्ये मोठा उलटफेर करण्याची शक्यता आहे. भारताने उरलेले तिन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकले आणि न्यूझीलंडचा अफगाणिस्तानविरुद्ध पराभव झाला, तरच नेट रन रेटच्या माध्यमातून टीम इंडिया सेमी फायनलला पोहोचू शकते.

IND vs PAK: सर्व बाजूंनी टीका झाल्यावर वकार युनूस बॅकफूटवर, हिंदूंबद्दल म्हणाला...VIDEO

First published:

Tags: T20 world cup, Team india