मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs PAK: सर्व बाजूंनी टीका झाल्यावर वकार युनूस बॅकफूटवर, हिंदूंबद्दल म्हणाला...VIDEO

IND vs PAK: सर्व बाजूंनी टीका झाल्यावर वकार युनूस बॅकफूटवर, हिंदूंबद्दल म्हणाला...VIDEO

 टी20 वर्ल्ड कपमधील मॅचमध्ये (T20 World Cup 2021) पाकिस्ताननं टीम इंडियाचा 10 विकेट्सनं पराभव केला होता. या विजयावर बोलताना पाकिस्तानचा माजी कॅप्टन, कोच वकार युनूसची (Waquar Younis) जीभ घसरली होती.

मुंबई, 27 ऑक्टोबर: भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात रविवारी झालेल्या मॅचचे पडसाद अजूनही उमटत आहेत. टी20 वर्ल्ड कपमधील मॅचमध्ये (T20 World Cup 2021) पाकिस्ताननं टीम इंडियाचा 10 विकेट्सनं पराभव केला होता. या विजयावर बोलताना पाकिस्तानचा माजी कॅप्टन, कोच वकार युनूसची (Waquar Younis) जीभ घसरली होती. या त्याच्या वक्तव्यावर सर्वत्र टीका झाली होती. या टीकेनंतर वकार अखेर बॅकफूटवर आला आहे.

पाकिस्तानच्या विजयाचे विश्लेषण करताना वकारने धर्म मध्ये आणला. 'भारत पाकिस्तान मॅचदरम्यान हिंदूंच्या मध्ये मोहम्मद रिझवानने नमाझ पठण केलं. त्याच्या बॅटिंगपेक्षा हे जास्त आनंद देणारं होतं,' असं वकार युनूस म्हणाला होता.

वकार युनूसच्या या वक्तव्यावर भारतीय कॉमेंटेटर हर्षा भोगले (Harsha Bhogle) यांनी टीका केली आहे. 'वकार युनूससारख्या माणसाने असं वक्तव्य केल्यामुळे मी निराश झालो आहे. अशा वक्तव्यांवर न बोलता आम्ही खेळाविषयी बोलतो, पण अशी वक्तव्यं ऐकणं भयानक आहे. पाकिस्तानमधल्या खऱ्या क्रिकेट प्रेमींना या वक्तव्यामधला धोका कळेल आणि तेदेखील निराशा व्यक्त करतील, अशी माझी अपेक्षा आहे. अशा वक्तव्यांमुळे क्रिकेट हा फक्त खेळ आहे आणि ही फक्त क्रिकेट मॅच आहे, असं सांगणं आमच्यासारख्या क्रीडाप्रेमींना कठीण जातं,' असं हर्षा भोगले त्यांच्या ट्वीटमध्ये म्हणाले.

हर्षा भोगले प्रमाणेच सोशल मीडियावर सर्व बाजूनी या विषयावर जोरदार प्रतिक्रिया उमटली. अखेर पाकिस्तानच्या टीव्ही चॅनलवर बोलताना वकारनं यावर स्पष्टीकरण दिलं आहे. 'मी भावनेच्या भरात ते वक्तव्य केलं. माझा तसं बोलण्याचा उद्देश नव्हता. या वक्तव्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे मी माफी मागतो. माझ्याकडून खरंच चूक झाली. लोकांमधील धार्मिक भेद आणि रंगभेद विसरण्याचं खेळ हे माध्यम आहे.' असं वकारनं सांगितलं.

हर्षा भोगले यांनी वकारनं माफी मागावी अशी अपेक्षा केली होती. त्यानंतर वकारनं हे वक्तव्य करत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

First published:

Tags: India vs Pakistan, T20 world cup