मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup : विराटची आणखी एक रणनिती फेल, फक्त दोनदा संधी दिलेल्या खेळाडूचा धमाका!

T20 World Cup : विराटची आणखी एक रणनिती फेल, फक्त दोनदा संधी दिलेल्या खेळाडूचा धमाका!

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाने (Team India) लाजिरवाणी कामगिरी केली आहे. या वर्ल्ड कपमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) घेतलेल्या निर्णयांवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाने (Team India) लाजिरवाणी कामगिरी केली आहे. या वर्ल्ड कपमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) घेतलेल्या निर्णयांवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाने (Team India) लाजिरवाणी कामगिरी केली आहे. या वर्ल्ड कपमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) घेतलेल्या निर्णयांवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

शारजाह, 1 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाने (Team India) लाजिरवाणी कामगिरी केली आहे. पहिले पाकिस्तानविरुद्ध 10 विकेटने पराभव झाल्यानंतर आता न्यूझीलंडविरुद्धचा सामना भारताने 8 विकेटने गमावला. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये झालेल्या पराभवामुळे टीम इंडियाचं सेमी फायनलला पोहोचण्याचं स्वप्न धूसर झालं आहे. या वर्ल्ड कपमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) घेतलेल्या निर्णयांवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विराट कोहलीने घेतलेला महिन्याभरापूर्वी घेतलेला असाच एक निर्णयही फसला आहे. आयपीएलमध्ये (IPL 2021) विराटच्या आरसीबीकडून खेळलेला वानिंदु हसरंगा (Wanindu Hasaranga) टी-20 वर्ल्ड कपमध्ये धमाका करत आहे.

लेग स्पिनर असलेल्या वानिंदु हसरंगाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात (Sri Lanka vs South Africa) हॅट्रिक घेतली होती. टी-20 वर्ल्ड कपमध्ये हॅट्रिक घेणारा हसरंगा फक्त तिसरा बॉलर आहे. यानंतर सोमवारी इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्येही (Sri Lanka vs England) त्याने चमकदार कामगिरी केली. हसरंगाने पहिल्याच ओव्हरमध्ये जेसन रॉयची (Jason Roy) विकेट घेतली. यानंतर त्याने जॉनी बेयरस्टोला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. 2021 मध्ये सर्वाधिक 34 टी-20 विकेट घेण्याचा विक्रमही हसरंगाच्या नावावर आहे. एका वर्षामध्ये कोणत्याही बॉलरची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

वानिंदु हसरंगा आयपीएल 2021 मध्ये विराट कोहलीच्या आरसीबीमध्ये (RCB) होता, पण विराटने त्याला फक्त दोन मॅचमध्येच संधी दिली, यात त्याला एकही विकेट घेता आली नाही. टी-20 वर्ल्ड कपमध्ये मात्र त्याने उत्तम कामगिरी केली आहे. या स्पर्धेत हसरंगाने आतापर्यंत सर्वाधिक 14 विकेट घेतल्या आहेत. 9 रनमध्ये 3 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. हसरंगाचा इकोनॉमी रेटही फक्त 5.04 आहे.

शम्सीला टाकलं मागे

वानिंदु हसरंगाने दक्षिण आफ्रिकेच्या तबरेझ शम्सीला मागे टाकलं आहे. शम्सीने या वर्षात सर्वाधिक 32 विकेट घेण्याचा विक्रम केला होता, पण हा विक्रम हसरंगाने मोडित काढला. शम्सीने या टी-20 वर्ल्ड कपमध्ये 4 विकेट घेतल्या आहेत. शम्सी सध्या टी-20 क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचा बॉलर आहे.

वानिंदु हसरंगा वनडे आणि टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये हॅट्रिक घेणारा जगातला चौथा बॉलर आहे. हसरंगाने 32 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 50 विकेट घेतल्या. 9 रन देऊन 4 विकेट त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

First published:

Tags: T20 world cup, Virat kohli