मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup मध्ये पाकिस्तानविरुद्ध कधीच आऊट झाला नाही हा भारतीय, तिन्ही वेळा मिळवून दिला विजय!

T20 World Cup मध्ये पाकिस्तानविरुद्ध कधीच आऊट झाला नाही हा भारतीय, तिन्ही वेळा मिळवून दिला विजय!

टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) 17 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे, पण स्पर्धेतला सगळ्यात मोठा मुकाबला भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात 24 ऑक्टोबरला होईल.

टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) 17 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे, पण स्पर्धेतला सगळ्यात मोठा मुकाबला भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात 24 ऑक्टोबरला होईल.

टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) 17 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे, पण स्पर्धेतला सगळ्यात मोठा मुकाबला भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात 24 ऑक्टोबरला होईल.

दुबई, 14 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) 17 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे, पण स्पर्धेतला सगळ्यात मोठा मुकाबला भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात 24 ऑक्टोबरला होईल. वर्ल्ड कपमध्ये भारताचा पाकिस्तानविरुद्ध कधीच पराभव झालेला नाही. वनडे वर्ल्ड कपमध्ये 7 वेळा आणि टी-20 वर्ल्ड कपमध्ये 5 वेळा दोन्ही टीम आमने-सामने होत्या, यातल्या सगळ्या सामन्यांमध्ये टीम इंडियाचा विजय झाला. टी-20 वर्ल्ड कपमध्ये तर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचं (Virat Kohli) पाकिस्तानविरुद्धचं रेकॉर्ड उत्कृष्ट आहे.

टी-20 वर्ल्ड कपमध्ये विराट कोहली पाकिस्तानविरुद्ध कधीच आऊट झाला नाही, एवढच नाही तर त्याने भारताला तिन्ही वेळा विजयही मिळवून दिला आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये विराटने पाकिस्तानविरुद्ध 78 नाबाद, 36 नाबाद आणि 55 नाबाद रनची खेळी केली. 3 मॅचपैकी 2 सामन्यांमध्ये तर विराट मॅन ऑफ द मॅच होता.

T20 World Cup नंतर कॅप्टन कोहलीच नाही तर टीम इंडियाचे खेळाडूही बदलणार; यांना मिळणार संधी!

2012 वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानने पहिले बॅटिंग करत फक्त 128 रन केले. फास्ट बॉलर लक्ष्मीपती बालाजीने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. या आव्हानाचा पाठलाग टीम इंडियाने 17 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून पूर्ण केला. विराटने 61 बॉलमध्ये 8 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने नाबाद 78 रन केले.

2014 साली ढाक्यात झालेल्या सामन्यातही पाकिस्तानने पहिले बॅटिंग करत 7 विकेट गमावून 130 रन केले. भारताने हे आव्हान 18.3 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून पार केलं, विराट 36 रनवर नाबाद राहिला. या सामन्यातही तो टीमचा सर्वाधिक रन करणारा खेळाडू होता.

2016 साली कोलकात्यामध्ये परत एकदा भारत-पाकिस्तान यांच्यात मुकाबला पाहायला मिळाला. 18 ओव्हरच्या या सामन्यात पाकिस्तानने पहिले बॅटिंग करत 5 विकेट गमावून 118 रन केले. टीम इंडियाने हे आव्हान 15.5 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून पूर्ण केलं. कोहलीने नाबाद 55 रनची खेळी केली, ज्याबद्दल त्याला मॅन ऑफ द मॅच देण्यात आलं. टी-20 वर्ल्ड कपच्या तिन्ही सामन्यांमध्ये विराट टीम इंडियाचा सर्वाधिक रन करणारा खेळाडू होता.

World Cup मध्ये 12 वेळा पराभव, तरी तुटला नाही घमंड, IND vs PAK सामन्याआधी बाबरचा माईंड गेम

पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक रन

विराट कोहली टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक रन करणारा भारतीय खेळाडूही आहे. पाकिस्तानविरुद्ध त्याने 3 सामन्यांमध्ये 169 रन केले आहेत, यात त्याचा स्ट्राईक रेटही 130 चा आहे. दुसऱ्या कोणत्याही भारतीयाला 100 रनचा आकडाही पार करता आलेला नाही. गौतम गंभीर 75 रनसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर पाकिस्तानकडून फक्त शोएब मलिकने भारताविरुद्ध 100 पेक्षा जास्त रन केले आहेत.

IND vs PAK महामुकाबल्याआधी पुन्हा 'मौका-मौका', काचा फुटणार का टीव्ही? पाहा VIDEO

First published:

Tags: India vs Pakistan, T20 world cup, Virat kohli