• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup : न्यूझीलंडविरुद्धच्या मॅचआधी विराटला खेळाडूंचा फॉर्म नाही, तर या गोष्टीची चिंता

T20 World Cup : न्यूझीलंडविरुद्धच्या मॅचआधी विराटला खेळाडूंचा फॉर्म नाही, तर या गोष्टीची चिंता

टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने टीम इंडियाला (India vs Pakistan) पराभवाचा धक्का दिला. यानंतर आता टीम इंडियाला एका आठवड्याची विश्रांती आहे. भारताचा पुढचा सामना न्यूझीलंडविरुद्ध (India vs New Zealand) रविवार 31 ऑक्टोबरला होणार आहे.

 • Share this:
  दुबई, 25 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने टीम इंडियाला (India vs Pakistan) पराभवाचा धक्का दिला. यानंतर आता टीम इंडियाला एका आठवड्याची विश्रांती आहे. भारताचा पुढचा सामना न्यूझीलंडविरुद्ध (India vs New Zealand) रविवार 31 ऑक्टोबरला होणार आहे. या सामन्याआधी मिळणारा ब्रेक टीमसाठी महत्त्वाचा असल्याची प्रतिक्रिया टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) दिली आहे. 'प्रत्येक दृष्टीने आमच्यासाठी हे चांगलं आहे. आम्ही संपूर्ण मोसम आणि आयपीएल खेळून आलो आहोत, आता वर्ल्ड कप खेळत आहे,' असं विराट म्हणाला. 'अशाप्रकारची विश्रांती फिटनेसचा स्तर ठेवण्यासाठी मदत करते, कारण अशाप्रकारच्या स्पर्धांमध्ये तुम्हाला सर्वोत्तम कामगिरी करायची असते. या ब्रेकमुळे आम्हाला पुढच्या मॅचची रणनिती नव्याने करण्याची संधी मिळेल. आम्ही पूर्ण आत्मविश्वासाने मैदानात पुनरागमन करू. आम्हाला आत्मचिंतन करण्याची आणि तयारी करण्याचीही संधी मिळाली आहे,' असं वक्तव्य विराटने केलं. पाकिस्तानची टीम आमच्यापेक्षा जास्त चांगली खेळल्याचं विराटने मान्य केलं, पण विराटने पुढच्या सामन्याआधी धुक्याबाबत चिंता व्यक्त केली. धुक्यामुळे दुसरी बॅटिंग करणाऱ्या टीमला फायदा होईल. टॉसची भूमिका महत्त्वाची ठरेल. दुसऱ्या इनिंगमध्ये अशाप्रकारचं धुकं पडत असेल, तर पहिल्या इनिंगमध्ये तुम्हाला जास्त रन करावे लागतील, असं विराटने सांगितलं. 'आमच्या चुका कुठे झाल्या, ते आम्हाला माहिती आहे. या चुकांमधून आम्ही नक्की सुधारू. आम्ही मेहनत करून पुढे चांगली कामगिरी करू, कारण अजून बऱ्याच मॅच शिल्लक आहेत,' असं विराट म्हणाला. टीम इंडिया सुपर-12 च्या दुसऱ्या ग्रुपमध्ये आहे. भारताचे सगळे सामने संध्याकाळी 7.30 वाजता आहेत. या ग्रुपमध्ये भारत एकूण 5 मॅच खेळणार आहे, यातल्या 4 मॅच दुबईमध्ये तर एक मॅच अबु धाबीमध्ये होणार आहे. भारताचे वेळापत्रक (Team India Schedule) 24 ऑक्टोबर- भारत विरुद्ध पाकिस्तान सायंकाळी 7: 30 वाजता 31 ऑक्टोबर- भारत विरुद्ध न्यूझीलंड सायंकाळी 7: 30 वाजता 3 नोव्हेंबर- भारत विरुद्ध अफगाणिस्तान सायंकाळी 7: 30 वाजता 5 नोव्हेंबर- भारत विरुद्ध स्कॉटलंड सायंकाळी 7: 30 वाजता 8 नोव्हेंबर- भारत विरुद्ध नामिबिया सायंकाळी 7: 30 वाजता
  Published by:Shreyas
  First published: