मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup : विराट-शास्त्रींनी 2019 चीच पुनरावृत्ती केली, या 3 चुकांनी केला टीम इंडियाचा घात

T20 World Cup : विराट-शास्त्रींनी 2019 चीच पुनरावृत्ती केली, या 3 चुकांनी केला टीम इंडियाचा घात

विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात टीम इंडिया (Team India) टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) चांगली कामगिरी करू शकली नाही. कॅप्टन विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्या जोडीसाठी नामिबियाविरुद्धचा सामना शेवटचा आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

दुबई, 8 नोव्हेंबर : विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात टीम इंडिया (Team India) टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) चांगली कामगिरी करू शकली नाही. सुपर-12 स्टेजमध्येच टीमचं आव्हान संपुष्टात आलं. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध दारूण पराभव झाल्यानंतर अफगाणिस्तान आणि स्कॉटलंडविरुद्ध भारताने दणदणीत विजय मिळवला, पण याचा काहीच फायदा झाला नाही. टीम इंडियाचं भवितव्य रविवारी झालेल्या अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातल्या सामन्यावर अवलंबून होतं. या सामन्यात अफगाणिस्तानने न्यूझीलंडचा पराभव केला असता तर टीम इंडियासाठी सेमी फायनलचे दरवाजे उघडले असते, पण न्यूझीलंडचा विजय झाल्यामुळे ते सेमी फायनलमध्ये पोहोचले.

कॅप्टन विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्या जोडीसाठी नामिबियाविरुद्धचा सामना शेवटचा आहे. आपण वर्ल्ड कपनंतर टी-20 फॉरॅमटची कॅप्टन्सी सोडणार असल्याचं विराटने आधीच जाहीर केलं होतं. तर रवी शास्त्री यांचा कार्यकाळही टी-20 वर्ल्ड कपनंतर संपणार आहे. विराट आणि शास्त्री यांच्या जोडीने भारताला अनेक ऐतिहासिक विजय मिळवून दिले, पण त्यांना एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही. 2019 वनडे वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्येही टीम इंडियाचा सेमी फायनलमध्ये पराभव झाला होता. वनडे आणि टी-20 वर्ल्ड कपमध्ये विराट-शास्त्रींनी सारख्याच चुका केल्या.

हार्दिक पांड्याचा पर्याय शोधण्यात अपयश

2019 वर्ल्ड कपमध्ये चौथ्या क्रमांकाचा बॅट्समन टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरला होता. वर्ल्ड कपआधी अंबाती रायुडू (Ambati Rayudu) चौथ्या क्रमांकावर खेळत होता, पण वर्ल्ड कपच्या आधीच त्याला टीममधून बाहेर केलं गेलं, यावेळीही असंच झालं. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) एका वर्षापासून फिट नाही, यानंतरही त्याचा पर्याय शोधण्यात आला नाही.

सहाव्या बॉलरची कमी

भारताने टी-20 वर्ल्ड कपच्या सगळ्या सामन्यांमध्ये फक्त 5 बॉलर्सना खेळण्याची संधी दिली, ज्याचा टीम इंडियाला मोठा फटका बसला. मोहम्मद शमी (Mohammad Shami) आणि शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) हे दोन्ही बॉलर महागडे ठरले, पण सहावा बॉलर उपलब्ध नसल्यामुळे विराटला पुन्हा त्यांनाच बॉलिंग देण्यावाचून पर्याय नव्हता. वर्ल्ड कप खेळणाऱ्या दुसऱ्या टीममध्ये 6 ते 7 बॉलर होते.

खेळाडूंवर विश्वास नाही

टी-20 वर्ल्ड कपमध्ये प्रत्येक सामन्यात विराटने टीममध्ये बदल केले. ईशान किशन, भुवनेश्वर कुमार आणि शार्दुल ठाकूरला पहिले टीममध्ये घेण्यात आलं, मग त्यांना बाहेर बसवण्यात आलं. 2019 वर्ल्ड कपमध्येही रवींद्र जडेजा, विजय शंकर आणि दिनेश कार्तिक यांच्यासोबतही असंच करण्यात आलं होतं. कार्तिकला 3, शंकरला 3 आणि जडेजाला फक्त 2 मॅच खेळण्याची संधी देण्यात आली होती.

First published:

Tags: Ravi shastri, T20 world cup, Team india, Virat kohli