मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup : विराट-शास्त्री युगाचा अंत, गुरू-शिष्याने इतिहास घडवला पण शेवट गोड नाही

T20 World Cup : विराट-शास्त्री युगाचा अंत, गुरू-शिष्याने इतिहास घडवला पण शेवट गोड नाही

नामिबियाचा पराभव करत टीम इंडियाचं (India vs Namibia) टी-20 वर्ल्ड कपमधलं (T20 World Cup) आव्हान संपुष्टात आलं. नामिबियाविरुद्धच्या सामना विराट कोहलीचा (Virat Kohli) कर्णधार म्हणून तर रवी शास्त्रींचा (Ravi Shastri) कोच म्हणून अखेरचा सामना ठरला.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

दुबई, 8 नोव्हेंबर : नामिबियाचा पराभव करत टीम इंडियाचं (India vs Namibia) टी-20 वर्ल्ड कपमधलं (T20 World Cup) आव्हान संपुष्टात आलं. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध दारूण पराभव झाल्यानंतर भारताने अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाला धूळ चारली, पण पहिल्या दोन पराभवांमुळे भारताचं सेमी फायनलला पोहोचण्याचं स्वप्न भंगलं. नामिबियाविरुद्धच्या सामना विराट कोहलीचा (Virat Kohli) कर्णधार म्हणून तर रवी शास्त्रींचा (Ravi Shastri) कोच म्हणून अखेरचा सामना ठरला. टी-20 वर्ल्ड कपनंतर आपण टी-20 फॉरमॅटची कॅप्टन्सी सोडणार असल्याचं विराटने आधीच जाहीर केलं होतं, तर रवी शास्त्रींचा कार्यकाळ टी-20 वर्ल्ड कपनंतर संपणार होता.

विराट कोहली आणि रवी शास्त्री यांच्या जोडीने टीम इंडियाला अनेक ऐतिहासिक विजय मिळवून दिले, पण त्यांना भारताला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकवून देता आली नाही. विराट आणि शास्त्री यांच्या जोडीमध्ये भारताने 2019 वर्ल्ड कप, 2021 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप आणि टी-20 वर्ल्ड कप खेळला. यातल्या 2019 वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये भारताचा पराभव झाला, तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये न्यूझीलंडने भारताला पराभूत केलं. टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीमचं आव्हान सुपर-12 मध्येच संपुष्टात आलं. मागच्या वर्षी झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मेलबर्न टेस्टमध्ये भारताचा 36 रनवर ऑल आऊट झाला. भारताचा टेस्ट क्रिकेटमधला हा निच्चांकी स्कोअर आहे.

विराट आणि शास्त्रींना एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नसली तरी टेस्ट क्रिकेटमध्ये मात्र भारतीय टीम वेगळ्या उंचीवर गेली. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा ऑस्ट्रेलियात दोनदा पराभव केला. तसंच इंग्लंडमध्ये भारताने टेस्ट सीरिजमध्ये 2-1 ने आघाडी घेतली.

टी-20 मध्ये विराट कोहलीने 50 मॅचमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व केलं, यातल्या 30 मॅचमध्ये भारताचा विजय झाला.

रवी शास्त्रींचं करियर

रवी शास्त्री प्रशिक्षक असताना भारताने 43 पैकी 25 टेस्ट जिंकल्या, तर 13 टेस्टमध्ये टीमचा पराभव झाला आणि 5 टेस्ट ड्रॉ झाल्या. 76 वनडेपैकी 51 वनडेमध्ये टीमने विजय मिळवला तर 22 वनडेमध्ये पराभव झाला. 2 मॅच टाय झाल्या आणि एका मॅचचा निकाल लागला नाही. शास्त्री कोच असताना 65 टी-20 मध्ये 43 सामने भारताने जिंकले तर 18 मॅचमध्ये टीमचा पराभव झाला. 2 मॅच टाय झाल्या आणि 2 मॅचचा निकाल लागला नाही. शास्त्री कोच असताना 184 सामन्यांपैकी 119 मॅच भारताने जिंकल्या, 53 मॅचमध्ये टीमचा पराभव झाला, 5 मॅच ड्रॉ झाल्या, 4 मॅच टाय झाल्या आणि 3 सामन्यांचा निकाल लागू शकला नाही.

First published:

Tags: Ravi shastri, T20 world cup, Virat kohli