• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup : IND vs PAK सामन्याआधी त्या प्रश्नावरून भडकला विराट कोहली

T20 World Cup : IND vs PAK सामन्याआधी त्या प्रश्नावरून भडकला विराट कोहली

टीम इंडियाच्या टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) मोहिमेला पाकिस्तानविरुद्धच्या (India vs Pakistan) सामन्यापासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेनंतर विराट कोहली (Virat Kohli) टी-20 फॉरमॅटची कॅप्टन्सी सोडणार आहे.

 • Share this:
  दुबई, 23 ऑक्टोबर : टीम इंडियाच्या टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) मोहिमेला पाकिस्तानविरुद्धच्या (India vs Pakistan) सामन्यापासून सुरुवात होणार आहे. रविवारी संध्याकाळी 7.30 वाजता दुबईच्या मैदानात हा सामना रंगेल. या स्पर्धेनंतर विराट कोहली (Virat Kohli) टी-20 फॉरमॅटची कॅप्टन्सी सोडणार आहे. मागच्या महिन्यात सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून विराटने याची घोषणा केली होती. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहलीला त्याच्या या निर्णयाबाबत प्रश्न विचारण्यात आला, पण या प्रश्नावर विराट कोहली भडकला. या मुद्द्यावरून मी तुम्हाला कोणताही मसाला देणार नाही, असं विराटने सांगितलं. कॅप्टन्सी सोडण्याच्या विराटच्या निर्णयावरून अनेक वाद झाले. यावरून विराटला प्रश्न विचारण्यात आला, पण मी या मुद्द्यावर खूप बोललो आहे, त्यामुळे आता आणखी बोलण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया विराटने दिली. आमचं लक्ष वर्ल्ड कपमध्ये चांगलं खेळण्यावर आहे. एक टीम म्हणून आम्हाला जे करण्याची गरज आहे, ते आम्ही करू. काही लोकं अशा गोष्टी खोदण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्या अस्तित्वातच नाहीत. मी तुम्हाला कोणताही मसाला देणार नाही, असं उत्तर विराटने दिलं. मी इमानदारीत आणि स्पष्टपणे गोष्टी समजावल्या आहेत, पण लोकांना याशिवायही काही गोष्टी आहेत, असं वाटत असेल तर मला त्यांच्याविषयी वाईट वाटतं, तुम्हाला जे वाटतंय तसं काहीही नाही, असं वक्तव्य विराटने केलं. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनीही विराटवर कॅप्टन्सी सोडण्याबाबत कोणताही दबाव नव्हता, अशी प्रतिक्रिया आज तकशी बोलताना दिली. 'विराटने जेव्हा टी-20 फॉरमॅटची कॅप्टन्सी सोडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा मीदेखील हैराण झालो होतो. हा निर्णय इंग्लंड दौऱ्यानंतरच घेण्यात आला असेल. हा त्याचा स्वत:चा निर्णय आहे. आमच्याकडून कोणताही दबाव टाकण्यात आला नाही. आम्ही त्याला काहीही सांगितलं नव्हतं,' असं गांगुलीने स्पष्ट केलं. 'आम्ही अशाप्रकारच्या गोष्टी करत नाही, कारण मी स्वत: एक खेळाडू होतो. मला या गोष्टी समजतात. एवढा काळ सगळ्या फॉरमॅटमध्ये कॅप्टन राहणं खूप कठीण आहे. मी सहा वर्ष कॅप्टन होतो, बाहेरून हे चांगलं वाटंत. तसंच हा सन्मानही आहे, पण तुम्ही आतमध्ये त्रासलेले असता. कोणत्याही कर्णधारासोबत हे होतं. अशा गोष्टी फक्त तेंडुलकर, गांगुली, धोनी किंवा कोहली नाही तर जो कॅप्टन होईल, त्याच्याबाबतीतही होईल. हे काम खूप कठीण आहे,' असं गांगुली म्हणाला.
  Published by:Shreyas
  First published: