मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

विराट कोहलीला मित्रानेच दिला मोठा धक्का, उपकर्णधार होताच केएल राहुल पडला भारी

विराट कोहलीला मित्रानेच दिला मोठा धक्का, उपकर्णधार होताच केएल राहुल पडला भारी

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाची (Team India) कामगिरी निराशाजनक झाली. यानंतर आता विराट कोहलीला (Virat Kohli) केएल राहुलने (KL Rahul) मोठा धक्का दिला आहे.

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाची (Team India) कामगिरी निराशाजनक झाली. यानंतर आता विराट कोहलीला (Virat Kohli) केएल राहुलने (KL Rahul) मोठा धक्का दिला आहे.

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाची (Team India) कामगिरी निराशाजनक झाली. यानंतर आता विराट कोहलीला (Virat Kohli) केएल राहुलने (KL Rahul) मोठा धक्का दिला आहे.

  • Published by:  Shreyas

दुबई, 10 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाची (Team India) कामगिरी निराशाजनक झाली. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध दारूण पराभव झाल्यानंतर भारताने अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाला धूळ चारली, पण पहिल्या दोन पराभवांमुळे टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचता आलं नाही. कर्णधार म्हणून विराट कोहलीची (Virat Kohli)ही अखेरची सीरिज होती. टी-20 वर्ल्ड कपनंतर आपण सगळ्यात छोट्या फॉरमॅटची कॅप्टन्सी सोडणार असल्याचं विराटने आधीच जाहीर केलं होतं. यानंतर मंगळवारी टी-20 साठी टीम इंडियाच्या नव्या कर्णधाराची घोषणा करण्यात आली. रोहित शर्माकडे (Rohit Sharma) टीमचं नेतृत्व देण्यात आलं, तर केएल राहुल (KL Rahul) टीमचा उपकर्णधार झाला.

केएल राहुल टीमचा उपकर्णधार होताच त्याने पहिला धक्का विराट कोहलीला दिला आहे. टी-20 वर्ल्ड कपमधल्या खराब कामगिरीचा फटका विराटला आयसीसीच्या क्रमवारीत (ICC T20 Ranking) बसला आहे. टी-20 क्रमवारीत विराट कोहली 4 स्थानं खाली 8 व्या क्रमांकावर आला आहे. नामिबियाविरुद्ध विराट कोहली बॅटिंगला उतरला नाही, तर केएल राहुलने नाबाद अर्धशतक केलं, ज्याचा फायदा त्याला क्रमवारीत झाला. केएल राहुल क्रमवारीमध्ये टॉप-5 मध्ये पोहोचला आहे.

आयसीसी क्रमवारीत पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आजम बॅटिंग क्रमवारीत पहिल्या, इंग्लंडचा डेव्हिड मलान दुसऱ्या, दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्करम तिसऱ्या, ऑस्ट्रेलियाचा एरॉन फिंच चौथ्या आणि केएल राहुल पाचव्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान सहाव्या, न्यूझीलंडचा डेवॉन कॉनवे सातव्या, विराट आठव्या, जॉस बटलर नवव्या आणि दक्षिण आफ्रिकेचा रस्सी व्हॅन डर डुसेन दहाव्या क्रमांकावर आला आहे.

जॉस हेजलवूडचा फायदा

ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर जॉस हेजलवूडचा बॉलिंग क्रमवारीत 11 स्थानांचा फायदा झाला आहे, तो आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात हेजलवूडने 4 विकेट घेतल्या होत्या. ऑस्ट्रेलियाचाच लेग स्पिनर एडम झम्पा टॉप-5मध्ये आला आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात झम्पाने 5 विकेट घेतल्या होत्या. भारताचा एकही बॉलर टॉप-5मध्ये नाही. श्रीलंकेचा लेग स्पिनर वानिंदु हसरंगा पहिल्या क्रमांकावर आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा तबरेझ शम्सी दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे.

ऑलराऊंडरच्या यादीत अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी पहिल्या क्रमांकावर आहे. बांगलादेशचा शाकिब अल हसन दुसऱ्या आणि वानिंदु हसरंगा तिसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलला तीन क्रमांकाचा फायदा होऊन तो चौथ्या क्रमांकावर आला आहे. या यादीतही टॉप-10 मध्ये एकही भारतीय नाही.

First published:

Tags: Kl rahul, T20 world cup, Team india, Virat kohli