Home /News /sport /

Video: T20 वर्ल्डकपआधी विराट कोहलीने पंतला दिले तगडं चॅलेंज

Video: T20 वर्ल्डकपआधी विराट कोहलीने पंतला दिले तगडं चॅलेंज

Video; T20 वर्ल्डकपआधी विराट कोहलीने पंतला दिले तगडे चॅलेज

Video; T20 वर्ल्डकपआधी विराट कोहलीने पंतला दिले तगडे चॅलेज

आयपीएलनंतर (IPL2021) क्रिकेट जगतात आता T20 वर्ल्डकपचे (T20 World Cup 2021) वारे वाहू लागले आहे. T20 वर्ल्डकपचे प्रबळ दावेदार बनण्याच्या दृष्टिने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) पावले उचलायाला सुरुवात केली आहे. दरम्यान...

पुढे वाचा ...
  नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर: आयपीएलनंतर (IPL2021) क्रिकेट जगतात आता T20 वर्ल्डकपचे (T20 World Cup 2021) वारे वाहू लागले आहे. T20 वर्ल्डकपचे प्रबळ दावेदार बनण्याच्या दृष्टिने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) पावले उचलायाला सुरुवात केली आहे. दरम्यान, त्याने आयपीएलमधील उत्कृष्ट कामगिरीमुळे क्रिकेट जगतात ऋषभ पंतची (Virat Kohli Challenges Rishabh Pant) सर्वत्र हवा पाहता त्याला तगडे आवाहन दिले आहे. ते आवाहन पंत पूर्ण करु शकेल का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 17 ऑक्टोबरपासून टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) सुरुवात होत आहे, तत्पूर्वी, स्टार स्पोर्ट्सने टी-20 वर्ल्डकपच्या निमित्ताने विराट कोहली आणि पंतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये दोघेही एकमेकांशी संवाद साधताना दिसत आहेत. हे वाचा- Captain Cool धोनी मैदानात उतरताच करणार 'हा' विक्रम व्हिडीओच्या सुरुवातीला कोहली पंतला सांगतो की, “ऋषभ टी-20मध्ये षटकारच सामने जिंकून देतात”. यावर पंत म्हणतो की, “चिंता नसावी…मी रोज सराव करत आहे. भारतीय संघाला षटकार मारुन वर्ल्डकप जिंकवून देणाराही विकेटकिपरच होता”. पंतचा हे बोलणे ऐकताच, “हो पण भारताला माही भाईनंतर तसा विकेटकिपर मिळाला नाही,” असं कोहलीने म्हणतो.
  तर बोलण्यात चपळ असणारा पंत, मी आहे ना असे म्हणतो. यावर कोहली त्याची गुगली घेत, “हे बघ माझ्याकडे खूप विकेटकिपर आहेत, बघूयात वॉर्मअपमध्ये कोण खेळतं”. असे तगडे आवाहन विराट यावेळी पंतला देतो. 2011 मध्ये वानखेडेच्या मैदानात धोनीने षटकार ठोकून भारताला अंतिम सामना जिंकवून देत इतिहास रचला होता. एकतर्फी फलंदाजी करत संपूर्ण सामन्याचे पारडे पालटण्याची क्षमता ऋषभ पंतमध्ये आहे. पण विकेटकिपर असल्याने त्याची नेहमी धोनीशी तुलना होत असते. हे वाचा- ओ तेरी! ऋषभ पंतनं नवरात्रामध्ये दिल्या भलत्याच शुभेच्छा, फॅन्सनी केली धुलाई आयपीएलच्या वॉर्मअप सामन्यात १८ आणि २० ऑक्टोबरला भारत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरोधात खेळणार आहे. यानंतर 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने स्पर्धेला सुरुवात होईल. यानंतर, भारताचा सामना 31 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडशी होईल. त्याच वेळी, 3 नोव्हेंबर रोजी, अबुधाबीमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध तिसरा सामना असेल.

  टी 20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ

  भारत (India): विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, राहुल चाहर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, आर अश्विन राखीव: श्रेयस अय्यर, दीपक चाहर आणि अक्षर पटेल. तर  भारताने संघ जाहीर केला असून माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला संघाचा मेन्टॉर म्हणून नेमण्यात आलं आहे.
  Published by:Dhanshri Otari
  First published:

  Tags: Rishabh pant, T20 cricket, T20 world cup, Virat kohli

  पुढील बातम्या