मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हार्दिक खेळणार का नाही? विराटने दिली मोठी Update

T20 World Cup : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हार्दिक खेळणार का नाही? विराटने दिली मोठी Update

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडिया आपला पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध (India vs Pakistan) खेळणार आहे, या सामन्याला आता 24 तासांचा कालावधी शिल्लक असला तरी ऑल राऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) या सामन्यात खेळणार का नाही, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

दुबई, 23 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडिया आपला पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध (India vs Pakistan) खेळणार आहे, या सामन्याला आता 24 तासांचा कालावधी शिल्लक असला तरी ऑल राऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) या सामन्यात खेळणार का नाही, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने हार्दिक पांड्याबद्दलच्या प्रश्नावर उत्तर दिलं. हार्दिक बॉलिंग करो अथवा न करो तो टीम इंडियाचा मॅच विनर आहे, असं विराट म्हणाला आहे. विराटच्या या वक्तव्यामुळे हार्दिक बॅटर म्हणूनच खेळणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. 2019 साली पाठीच्या दुखापतीनंतर हार्दिकने फार बॉलिंग केली नाही. यावर्षी आयपीएलमध्येही हार्दिकने बॉलिंग केली नाही. हार्दिक बॉलिंग करत नसेल, तर मग तो अंतिम 11 खेळाडूंमध्ये असेल का, याबाबत शंका उपस्थित केल्या जात होत्या.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये विराटने हार्दिक पांड्याचं कौतुक केलं. 'आम्ही सहाव्या क्रमांकावर बॅटिंग करणारा खेळाडू एका रात्रीत तयार करू शकत नाही. मी कायमच हार्दिकला पाठिंबा दिला आहे. ऑस्ट्रेलियात त्याने कशी कामगिरी केली, ते आपण बघितलं. मी बॅटर म्हणून हार्दिकला टीममध्ये ठेवलं. तो असा बॅटर आहे जो विरोधी टीमच्या हातातून मॅच खेचून आणू शकतो. तो आमचा मॅच विनर आहे. टी-20 मध्ये तुम्हाला अशा खेळाडूची गरज असते,' अशी प्रतिक्रिया विराट कोहलीने दिली.

हार्दिक पांड्याचा फिटनेस प्रत्येक दिवशी चांगला होत आहे, तो लवकरच बॉलिंगला सुरुवात करेल, अशी अपेक्षा विराटने व्यक्त केली. स्पर्धेमध्ये नंतर तो कमीत कमी 2 ओव्हर बॉलिंग नक्कीच करेल. पण सध्या तो ज्या गोष्टी करू शकत नाही, त्याबद्दल दबाव टाकण्यात काहीच अर्थ नाही, असं वक्तव्य विराटने केलं.

भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने (Gautam Gambhir) पांड्याला प्लेयिंग इलेव्हनमध्ये ठेवण्यावर आक्षेप घेतले होते. पांड्या जर बॉलिंग करणार असेल, तरच तो प्लेयिंग इलेव्हनमध्ये असला पाहिजे, असं गौतम गंभीर म्हणाला.

First published:

Tags: Hardik pandya, India vs Pakistan, T20 world cup, Virat kohli