मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup मध्ये वरुण चक्रवर्तीचं खेळणं कठीण, दुखापतीतही खेळतोय IPL!

T20 World Cup मध्ये वरुण चक्रवर्तीचं खेळणं कठीण, दुखापतीतही खेळतोय IPL!

मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीला (Varun Chakravarthy) आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा (T20 World Cup Team India) प्रमुख बॉलर मानलं जात आहे, पण बीसीसीआयच्या (BCCI) मेडिकल टीमला वरुण चक्रवर्तीला फिट ठेवण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 5 ऑक्टोबर : मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीला (Varun Chakravarthy) आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा (T20 World Cup Team India) प्रमुख बॉलर मानलं जात आहे, पण बीसीसीआयच्या (BCCI) मेडिकल टीमला वरुण चक्रवर्तीला फिट ठेवण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. वरुण चक्रवर्तीला गुडघ्याची दुखापत झाली आहे. 10 ऑक्टोबरपर्यंत भारतीय टीममध्ये बदल केले जाऊ शकतात, पण दुखापत असतानाही वरुणचं टीममध्ये असणं निश्चित मानलं जात आहे. दुखापतीतही तो आयपीएल 2021 (IPL 2021) खेळत आहे.

बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयशी बोलताना वरुणच्या दुखापतीबाबत माहिती दिली. 'वरुणच्या गुडघ्याची अवस्था फार चांगली नाही, पण जर टी-20 वर्ल्ड कप नसता तर भारतीय टीमने त्याला खेळवण्याचा धोका पत्करला नसता. सध्या टी-20 वर्ल्ड कपवरच लक्ष आहे, यानंतर त्याच्या उपचारांबाबत विचार केला जाईल,' असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितलं. आयपीएल 2021 मध्ये वरुणने 13 मॅचमध्ये 6.73 च्या इकोनॉमी रेटने 15 विकेट घेतल्या आहेत.

'केकेआरची मेडिकल टीम वरुण चक्रवर्तीचा फिटनेस कार्यक्रम तयार करत आहे. त्याला इंजक्शन दिली जात आहेत, त्यामुळे त्याला 4 ओव्हर टाकता येतील. या इंजक्शनमुळे दुखापतीतून दिलासा मिळतो. टीव्हीवर त्याला त्रास होत आहे, असं दिसत नाही, पण जेव्हा तो बॉलिंग करत नसतो तेव्हा त्याला त्रास होतो,' असं बीसीसीआयचा अधिकारी म्हणाला. वरुणने आपल्या बॉलिंगने एमएस धोनीसारख्या दिग्गज बॅट्समनला प्रभावित केलं आहे.

भारताचा पहिला मुकाबला पाकिस्तानशी

टीम इंडियाचा टी-20 वर्ल्ड कपमधला पहिला मुकाबला पाकिस्तानविरुद्ध (India vs Pakistan) 24 ऑक्टोबरला होणार आहे. भारताला 2007 नंतर टी-20 वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही, त्यामुळे 14 वर्षांचा हा वनवास संपवण्याचा प्रयत्न टीम इंडिया करेल. एमएस धोनीला (MS Dhoni) वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचं मेंटर करण्यात आलं आहे. वर्ल्ड कप संपल्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) टी-20 फॉरमॅटची कॅप्टन्सी सोडणार आहे.

First published:

Tags: T20 world cup, Team india