• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup बाबत BCCI ची अधिकृत घोषणा, या देशात होणार स्पर्धा

T20 World Cup बाबत BCCI ची अधिकृत घोषणा, या देशात होणार स्पर्धा

टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) बाबत बीसीसीआयने (BCCI) अधिकृत घोषणा केली आहे. यंदाच्या वर्षीचा वर्ल्ड कप भारतामध्ये न होता युएईमध्ये (UAE) खेळवण्यात येणार असल्याचं बीसीसीआयने सांगितलं, तसंच याबाबतची माहिती आज आयसीसीला (ICC) दिली जाईल, अशी माहितीही बीसीसीआयन दिली.

 • Share this:
  मुंबई, 28 जून: टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) बाबत बीसीसीआयने (BCCI) अधिकृत घोषणा केली आहे. यंदाच्या वर्षीचा वर्ल्ड कप भारतामध्ये न होता युएईमध्ये (UAE) खेळवण्यात येणार असल्याचं बीसीसीआयने सांगितलं, तसंच याबाबतची माहिती आज आयसीसीला (ICC) दिली जाईल, अशी माहितीही बीसीसीआयन दिली. टी-20 वर्ल्ड कपचं आयोजन ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होईल, पण त्याआधी युएईमध्येच आयपीएलचे (IPL 2021) उरलेले 31 सामने होणार आहेत. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी टी-20 वर्ल्ड कप युएईमध्ये हलवण्यात आल्याची माहिती दिली. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार जय शाह (Jay Shah) म्हणाले, 'आयसीसीला आज अधिकृतरित्या टी-20 वर्ल्ड कप युएईमध्ये खेळवला जाईल असं सांगण्यात आलं आहे. स्पर्धेच्या तारखांचा निर्णय आयसीसी घेईल.' कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता टी-20 वर्ल्ड कपचं आयोजन भारतात होणं मुश्कील होतं. ओमानमध्ये सुरुवातीचे सामने? 17 ऑक्टोबरपासून टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात होऊ शकते. या स्पर्धेत 16 टीम सहभागी होणार आहेत, तसंच फायनल 14 नोव्हेंबरला होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. याशिवाय स्पर्धेच्या काही मॅच ओमानमध्येही होऊ शकतात. आयपीएलचे उरलेले सामने युएईमध्ये होणार असल्यामुळे युएईवर जास्त दबाव येऊ नये, म्हणून सुरुवातीच्या काही सामन्यांचं ओमानमध्ये काही सामन्यांचं आयोजन होऊ शकतं. युएईमध्ये दुबई, शारजाह आणि अबुधाबी अशी 3 स्टेडियम आहेत. याआधी 2016 साली टी-20 वर्ल्ड कपचं आयोजन भारतात झालं होतं, तेव्हा वेस्ट इंडिज चॅम्पियन झाली होती. टी-20 वर्ल्ड कपमध्ये 16 टीममध्ये 45 मॅच होणार आहेत. पहिला राऊंड 8 टीममध्ये असेल. दोन ग्रुपमध्ये 4-4 टीम विभागल्या जातील आणि त्यांच्यात एकूण 12 मॅच होतील. दोन्ही ग्रुपच्या टॉप टीम सुपर 12 मध्ये प्रवेळ मिळवतील. या 12 टीमना दोन ग्रुपमध्ये विभागलं जाईल आणि त्यांच्या एकूण 30 मॅच होतील. यानंतर सेमी फायनल आणि फायनल खेळवली जाईल. आयपीएलही युएईमध्ये आयपीएलचे उरलेले 31 सामनेदेखील युएईमध्येच खेळवले जातील अशी माहिती आहे. वर्ल्ड कप जर युएईमध्ये होणार असेल, तर बीसीसीआयला आयपीएलही तिकडे खेळवण्यावाचून पर्याय नाही. कारण या दोन्ही स्पर्धांमध्ये अगदी थोड्या दिवसाचा वेळ असेल आणि एवढ्या कमी वेळात खेळाडूंना एका देशातून दुसऱ्या देशात नेण्यात आणि क्वारंटाईन करण्यात वेळ मिळणार नाही. 4 मे रोजी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफना कोरोनाची लागण झाल्यामुळे आयपीएल स्थगित करण्यात आली होती.
  Published by:Shreyas
  First published: