• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup : ज्यावर 'विश्वास' ठेवला त्यानेच घात केला, किवी खेळाडूने सांगितलं टीम इंडियाच्या पराभवाचं कारण

T20 World Cup : ज्यावर 'विश्वास' ठेवला त्यानेच घात केला, किवी खेळाडूने सांगितलं टीम इंडियाच्या पराभवाचं कारण

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाची (Team India) कामगिरी लाजिरवाणी झाली आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाचं सेमी फायनलला पोहोचण्याचं स्वप्नही अत्यंत धूसर झालं आहे.

 • Share this:
  दुबई, 2 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाची (Team India) कामगिरी लाजिरवाणी झाली आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाचं सेमी फायनलला पोहोचण्याचं स्वप्नही अत्यंत धूसर झालं आहे. टी-20 वर्ल्ड कप आधी आयपीएल (IPL 2021) खेळल्यामुळे भारतीय खेळाडूंचा चांगला सराव होईल, असं टीम इंडियाचा प्रत्येक खेळाडू सांगत होता, पण आयपीएलचा फायदा भारतीय खेळाडूंना होण्यापेक्षा परदेशी खेळाडूंनाच जास्त झाला. न्यूझीलंडचा फास्ट बॉलर टीम साऊदी (Tim Southee) यानेही आयपीएल खेळल्यामुळे आमच्या बॉलर्सचा फायदा झाल्याचं सांगितलं, त्यामुळे टीम इंडियाने आयपीएलवर विश्वास ठेवला असला तरी याच आयपीएलने टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा घात केला, असंच म्हणावं लागेल. न्यूझीलंडचे बॉलर ट्रेन्ट बोल्ट, टीम साऊदी, एडम मिल्ने, काईल जेमिसन आणि स्पिनर मिचेल सॅन्टनर हे खेळाडू आयपीएलच्या दुसऱ्या राऊंडमध्ये सहभागी झाले होते. 'अनेक खेळाडू आयपीएलचा भाग होते, वर्ल्ड कपआधी हे चांगलं होतं. त्यामुळे टीमला मदत झाली. आयपीएलमुळे आमच्या बॉलरना शिकायला मिळालं. आम्ही त्याच खेळपट्टीवर खेळत आहोत. आयपीएलमधल्या माहितीचा वापर आम्ही वर्ल्ड कपमध्ये करत आहोत,' असं टीम साऊदी म्हणाला. पाकिस्तानविरुद्ध पराभव झाल्यानंतर न्यूझीलंडने टीम इंडियाचा पराभव केला, त्यामुळे त्यांची सेमी फायनलला पोहोचण्याची आशा अजूनही कायम आहे. न्यूझीलंडचा सामना बुधवारी दुबळ्या स्कॉटलंडविरुद्ध होणार आहे. यानंतर किवी टीमचा सामना अफगाणिस्तान आणि नामिबियाविरुद्ध होईल. या तिन्ही सामन्यांमध्ये न्यूझीलंडचा विजय झाला तर ते पाकिस्तानसोबत सेमी फायनलला पोहोचतील. आतापर्यंत न्यूझीलंडला एकदाही टी-20 वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची कामगिरी लाजिरवाणी झाली आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाचं सेमी फायनलला पोहोचण्याचं स्वप्नही अत्यंत धूसर झालं आहे. टी-20 वर्ल्ड कप आधी आयपीएल खेळल्यामुळे भारतीय खेळाडूंचा चांगला सराव होईल, असं टीम इंडियाचा प्रत्येक खेळाडू सांगत होता, पण आयपीएलचा फायदा भारतीय खेळाडूंना होण्यापेक्षा परदेशी खेळाडूंनाच जास्त झाला. न्यूझीलंडचा फास्ट बॉलर टीम साऊदी यानेही आयपीएल खेळल्यामुळे आमच्या बॉलर्सचा फायदा झाल्याचं सांगितलं, त्यामुळे टीम इंडियाने आयपीएलवर विश्वास ठेवला असला तरी याच आयपीएलने टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा घात केला, असंच म्हणावं लागेल. न्यूझीलंडचे बॉलर ट्रेन्ट बोल्ट, टीम साऊदी, एडम मिल्ने, काईल जेमिसन आणि स्पिनर मिचेल सॅन्टनर हे खेळाडू आयपीएलच्या दुसऱ्या राऊंडमध्ये सहभागी झाले होते. 'अनेक खेळाडू आयपीएलचा भाग होते, वर्ल्ड कपआधी हे चांगलं होतं. त्यामुळे टीमला मदत झाली. आयपीएलमुळे आमच्या बॉलरना शिकायला मिळालं. आम्ही त्याच खेळपट्टीवर खेळत आहोत. आयपीएलमधल्या माहितीचा वापर आम्ही वर्ल्ड कपमध्ये करत आहोत,' असं टीम साऊदी म्हणाला. पाकिस्तानविरुद्ध पराभव झाल्यानंतर न्यूझीलंडने टीम इंडियाचा पराभव केला, त्यामुळे त्यांची सेमी फायनलला पोहोचण्याची आशा अजूनही कायम आहे. न्यूझीलंडचा सामना बुधवारी दुबळ्या स्कॉटलंडविरुद्ध होणार आहे. यानंतर किवी टीमचा सामना अफगाणिस्तान आणि नामिबियाविरुद्ध होईल. या तिन्ही सामन्यांमध्ये न्यूझीलंडचा विजय झाला तर ते पाकिस्तानसोबत सेमी फायनलला पोहोचतील. आतापर्यंत न्यूझीलंडला एकदाही टी-20 वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही.
  Published by:Shreyas
  First published: