• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup : सेमी फायनलच्या तीन टीम ठरल्या, भारताचं भवितव्य रविवारी ठरणार!

T20 World Cup : सेमी फायनलच्या तीन टीम ठरल्या, भारताचं भवितव्य रविवारी ठरणार!

टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) सुपर-12 राऊंडच्या अखेरच्या काही सामन्यांमध्ये सेमी फायनलच्या (T20 World Cup Semi Final) तीन टीम निश्चित झाल्या आहेत.

 • Share this:
  दुबई, 6 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) सुपर-12 राऊंडच्या अखेरच्या काही सामन्यांमध्ये सेमी फायनलच्या (T20 World Cup Semi Final) तीन टीम निश्चित झाल्या आहेत. पहिल्या ग्रुपच्या अखेरच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा पराभव केला, पण तरीही दक्षिण आफ्रिकेचं सेमी फायनलला पोहोचण्याचं स्वप्न भंगलं. पहिल्या ग्रुपमधून इंग्लंड (England) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) सेमी फायनलला पोहोचल्या आहेत. तर दुसऱ्या ग्रुपमधून पाकिस्तानची (Pakistan) टीम सेमी फायनलमध्ये दाखल झाली आहे. आता सेमी फायनलच्या चौथ्या स्थानासाठी भारत (Team India), न्यूझीलंड (New Zealand) आणि अफगाणिस्तान यांच्यात स्पर्धा आहे. सेमी फायनलची चौथी टीम रविवारी होणाऱ्या न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या सामन्यानंतर ठरेल. या सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव झाला तर न्यूझीलंड सेमी फायनलला पोहोचणारी चौथी टीम ठरेल. पण या सामन्यात अफगाणिस्तानने न्यूझीलंडला हरवलं, तर मात्र भारतासाठी सेमी फायनलचे दरवाजे उघडतील. अफगाणिस्तानचा विजय झाला तर सोमवारी भारताला नामिबियाला पराभूत करावं लागेल. भारताची निराशाजनक कामगिरी टी-20 वर्ल्ड कपच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये टीम इंडियाची कामगिरी अत्यंत लाजिरवाणी झाली. पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने भारताला 10 विकेटने पराभूत केलं, यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारताचा 8 विकेटने पराभव झाला. सुरुवातीच्या दोन पराभवांनंतर भारताने जोरदार पुनरागमन केलं. अफगाणिस्तानविरुद्ध टीम इंडियाचा 66 रनने विजय झाला. त्यानंतर भारताने स्कॉटलंडलाही मोठ्या फरकाने धूळ चारली. स्कॉटलंडने दिलेलं आव्हान भारताने फक्त 39 बॉलमध्येच पूर्ण केलं.
  Published by:Shreyas
  First published: