• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T 20 World Cup: आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये ‘टॉस ठरलाय बॉस’

T 20 World Cup: आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये ‘टॉस ठरलाय बॉस’

who wins thetoss is winner match

who wins thetoss is winner match

टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup)स्पर्धेत आत्तापर्यंत सुपर 12 फेरीत एकूण 9 सामने खेळले गेले आहेत. या सर्व सामन्यांमध्ये टॉसने महत्त्वाची भूमिका निभावली आहे.

 • Share this:
  दुबई, 28 ऑक्टोबर: टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup)स्पर्धेला युएईयेथे 17 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. आत्तापर्यंत सुपर 12 फेरीत एकूण 9 सामने खेळले गेले आहेत. या झालेल्या सामन्यांमध्ये हारजीत पाहायला मिळाली. विशेष म्हणजे,या सर्व सामन्यांमध्ये टॉसने महत्त्वाची भूमिका निभावली आहे. याच टॉसवरुन एक गमंतीशीर किस्सा समोर (who wins thetoss is winner match)आला आहे. बहुतांश सामन्यांमध्ये ज्या संघाच्या कर्णधाराने टॉस जिंकला आहे, त्याच संघाने सामन्यातही बाजी मारली असल्याचे चित्र समोर आले आहे. टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर 12 फेरीत बुधवारपर्यंत एकूण 9 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये गट 1 आणि गट 2 मधील सर्व 12 संघांनी प्रत्येकी 1 सामना खेळला आहे. या सर्व सामन्यांमधील अफगानिस्तान विरुद्ध स्कॉटलँड सामना वगळता इतर सर्व सामन्यांमध्ये प्रथम गोलंदाजी करणारा संघ विजयी बनला आहे. केवळ अफगानिस्तान संघाने, प्रथम फलंदाजी केल्यानंतर त्यांच्या प्रतिस्पर्धी संघाला लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करू दिलेला नाही.

  आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये ‘टॉस ठरलाय बॉस’

  १. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला – ऑस्ट्रेलिया 5 विकेटने विजयी २. इंग्लंडने टॉस जिंकला, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला – इंग्लंड 6 विकेटने विजयी ३. श्रीलंकेने टॉस जिंकला, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला – श्रीलंका 5 विकेटने विजयी ४. पाकिस्तानने टॉस जिंकला, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला- पाकिस्तान 10 विकेटने विजयी ५. अफगाणिस्तानने टॉस जिंकला , फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला- अफगाणिस्तान 130 धावांनी विजयी ६. दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला, गोलंदाजी करण्याचा निर्णय – दक्षिण आफ्रिका 8 विकेटने विजयी ७. पाकिस्तानने टॉस जिंकला, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला – पाकिस्तानचा 5 विकेटने विजयी ८. इंग्लंडने टॉस जिंकला, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला – इंग्लंडचा 8गडी राखून विजयी ९. नामबियाने टॉस जिंकला, गोलंदाजीचा करण्याचा निर्णय घेतला – नामबिया 4 विकेटने विजयी यावरुन युएईच्या कोणत्याही मैदानावर नाणेफेकीचा कौल ज्या संघाच्या पारड्यात पडेल, तोच संघ सामन्यात विजय मिळवणार असे म्हणायला हरकत नाही.
  Published by:Dhanshri Otari
  First published: