मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup: या दिवशी होऊ शकते टीम इंडियाची घोषणा, कोणाला मिळणार संधी, कोण होणार OUT?

T20 World Cup: या दिवशी होऊ शकते टीम इंडियाची घोषणा, कोणाला मिळणार संधी, कोण होणार OUT?

आशिया कप तर टीम इंडियाच्या हातून गेला आहे. आता टी २० वर्ल्ड कप मिळवण्याचं लक्ष्य टीमसमोर आहे. टीम इंडियाचे 5 खेळाडू सध्या दुखापतीमुळे किंवा आजारपणामुळे त्रस्त आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई : आशिया कप तर टीम इंडियाच्या हातून गेला आहे. आता टी २० वर्ल्ड कप मिळवण्याचं लक्ष्य टीमसमोर आहे. टीम इंडियाचे 5 खेळाडू सध्या दुखापतीमुळे किंवा आजारपणामुळे त्रस्त आहेत. त्यामुळे त्यापैकी कोण वर्ल्ड कपसाठी खेळणार? कोणाचा पत्ता टीम इंडियातून कट होणार याचा फैसला लवकरच होणार आहे.

टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध सीरिज खेळायची आहे. 16 सप्टेंबर रोजी बीसीसीआय टी २० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा करण्याची शक्यता आहे. रविंद्र जडेजा, बुमराह, आवेश खान लवकर बरे होऊन मैदानात परतावेत यासाठी सगळेजण प्रार्थना करत आहेत. रविंद्र जडेजाच्या गुडघ्यावर नुकतीच शस्त्रक्रिया पार पडली. त्यामुळे तो कदाचित टी २० वर्ल्ड कपमधून बाहेर जाण्याची शक्यता आहे.

जसप्रीत बुमराहच्या पाठीचं दुखणं वाढत आहे. त्यामुळे तो टी 20 वर्ल्ड कप खेळणार की नाही याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे. टी 20 वर्ल्ड कप 16 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. तर अंतिम सामना 13 नोव्हेंबर रोजी होणार आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर हा सामना होणार आहे.

हे वाचा-कुणी जवळपास पण नाही! वन मॅन विराट कोहलीची विक्रमांची बरसात

युजवेंद्र चहल, दीपक चाहर यांना टीम इंडियात संधी मिळणार का? रवि बिश्नोई देखील लिस्टमध्ये आहे. नवख्या कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. 5 खेळाडूंना दुखापत झाल्यानं रोहित शर्माचं टेन्शन वाढलं आहे. आता मॅनेजमेंटसमोर मोठा प्रश्न आहे. त्यामुळे या टीम निवडीकडे सगळ्यांचा नजरा आहेत.

हे वाचा-गल्ली क्रिकेटसारखे मैदानात भांडले आता ICC कडून या 2 खेळाडूंवर मोठी कारवाई

सुपर 12 चे सामने 22 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. यादरम्यान सिडनी क्रिकेट मैदानावर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला सामना होणार आहे. संपूर्ण स्पर्धेत भारत एकूण पाच सामने खेळणार आहे. पहिला सामना 23 ऑक्टोबरला पाकिस्तानशी, दुसरा सामना 27 ऑक्टोबरला अ गटातील उपविजेत्यासोबत, तिसरा सामना 30 ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध, त्यानंतर चौथा सामना 2 नोव्हेंबरला बांगलादेशविरुद्ध आणि पाचवा सामना यातील विजेत्याशी होईल.

First published:

Tags: Rohit sharma, Team india, Virat kohli