• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup : विराटच्या जवळच्या व्यक्तीचेच टीम इंडियाच्या निवडीवर प्रश्नचिन्ह, या दोन खेळाडूंवर निशाणा

T20 World Cup : विराटच्या जवळच्या व्यक्तीचेच टीम इंडियाच्या निवडीवर प्रश्नचिन्ह, या दोन खेळाडूंवर निशाणा

यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाची (Team India) कामगिरी निराशाजनक झाली. यानंतर टीम इंडियाच्या निवडीवर आणि कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) रणनितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं.

 • Share this:
  मुंबई, 7 नोव्हेंबर : यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाची (Team India) कामगिरी निराशाजनक झाली. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध दारूण पराभव झाल्यामुळे भारताचं सेमी फायनलला पोहोचण्याचं स्वप्न भंगलं. यानंतर अफगाणिस्तान आणि स्कॉटलंडविरुद्ध टीमने चांगली कामगिरी केली, पण सुरुवातीला व्हायचं ते नुकसान होऊन गेलं होतं. टीम इंडियाच्या या कामगिरीवर कर्णधार विराट कोहलीचे (Virat Kohli Coach) सुरुवातीच्या काळातले प्रशिक्षक आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते राजकुमार शर्मा (Rajkumar Sharma) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. टीम इंडियाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) आणि मोहम्मद शमीऐवजी (Mohammad Shami) दुसऱ्या खेळाडूंना संधी मिळाली पाहिजे, असं राजकुमार शर्मा म्हणाले. 'हार्दिक पांड्या (Hardik Pandya) बॉलिंग करत नव्हता, त्यामुळे त्याच्या निवडीवरही प्रश्न उपस्थित केले गेले. ऑलराऊंडर म्हणून तो टीमसाठी खूप महत्त्वाचा आहे, पण फक्त बॅट्समन म्हणून त्याला टीममध्ये ठेवणं कठीण निर्णय होता. युझवेंद्र चहल टीममध्ये असता तर कदाचित टीमला यश मिळालं असतं, कारण त्याने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली होती,' अशी प्रतिक्रिया विराटच्या प्रशिक्षकांनी दिली. 'मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांना टी-20 फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे निवड समिती नव्या बॉलरना संधी देऊ शकते, जे टी-20 साठी चांगले आहेत. मोहम्मद शणी टेस्ट मॅचसाठी सर्वोत्तम आहे, पण टी-20मध्ये तो एवढा यशस्वी नाही. टी-20 फॉरमॅटमध्ये तुम्हाला फास्ट बॉलिंगमध्ये बदल दिसतील, असं मला वाटतं. बॅटिंगमध्येही एक-दोन नव्या खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते,' असं राजकुमार शर्मा यांनी सांगितलं. 'केकेआरकडून खेळणारा व्यंकटेश अय्यर ऑलराऊंडर म्हणून चांगला पर्याय ठरू शकतो. युझवेंद्र चहलही चांगल्या कामगिरीमुळे पुनरागमन करू शकेल. ऋतुराज गायकवाड, मोहम्मद सिराज आणि नवदीप सैनी यांनीही चांगली कामगिरी केली आहे,' असं राजकुमार शर्मा म्हणाले. राहुल द्रविड टीम इंडियाचा नवा कोच झाला आहे. विराटला द्रविडसोबत काम करण्यात काहीच अडचण येणार नाही, कारण विराट द्रविडच्या नेतृत्वात आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळला आहे, असं वक्तव्य विराटच्या प्रशिक्षकांनी केलं. विराटने टी-20 फॉरमॅटची कॅप्टन्सी सोडली आहे, त्यामुळे विराटनंतर टीमचा कॅप्टन कोण होईल, याबाबतचा निर्णय निवड समिती घेईल. जास्त क्रिकेट होत असल्यामुळे विराटने हा निर्णय घेतला आहे, असं राजकुमार शर्मा यांनी सांगितलं.
  Published by:Shreyas
  First published: