मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup : 'खेळाडूंना पेट्रोल टाकून पळवू शकत नाही', शास्त्रींनी सांगितलं टीम इंडियाच्या खराब कामगिरीचं कारण

T20 World Cup : 'खेळाडूंना पेट्रोल टाकून पळवू शकत नाही', शास्त्रींनी सांगितलं टीम इंडियाच्या खराब कामगिरीचं कारण

 टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) नामिबियाविरुद्धचा सामना टीम इंडियाचे (India vs Namibia) मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा अखेरचा आहे. रवी शास्त्री यांचा कार्यकाळ टी-20 वर्ल्ड कपनंतर संपुष्टात येणार आहे.

  • Published by:  Shreyas

दुबई, 8 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) नामिबियाविरुद्धचा सामना टीम इंडियाचे (India vs Namibia) मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा अखेरचा आहे. रवी शास्त्री यांचा कार्यकाळ टी-20 वर्ल्ड कपनंतर संपुष्टात येणार आहे. यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमधून टीम इंडिया आधीच बाहेर झाली आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध दारूण पराभव झाल्यानंतर भारताचं सेमी फायनलला पोहोचणं आधीच कठीण झालं होतं. रविवारी न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या सामन्यानंतर भारताची सेमी फायनलला पोहोचण्याची शेवटची आशाही संपुष्टात आली. नामिबियाविरुद्धच्या सामन्याआधी रवी शास्त्री यांनी टीम इंडियाच्या कामगिरीचं विश्लेषण केलं. मागच्या सहा महिन्यांपासून टीम बायो-बबलमध्ये आहे. आयपीएल 2021 (IPL 2021) आणि टी-20 वर्ल्ड कपमध्ये फार अंतर नसल्यामुळे खेळाडूंच्या कामगिरीमध्ये फरक पडला, असं शास्त्री म्हणाले. भारतीय टीम 2012 नंतर पहिल्यांदाच टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलला पोहोचू शकली नाही.

स्टार स्पोर्ट्ससोबत बोलताना रवी शास्त्री म्हणाले, '6 महिने बायो-बबलमध्ये राहणं सोपं नाही. खेळाडूंना पेट्रोल टाकून पळवलं जाऊ शकत नाही. कोरोनाबाबत आयसीसी आणि बोर्डालाही विचार करावा लागेल. खेळाडू मानसिकदृष्ट्या प्रभावित झाले आहेत. जर याबाबत पावलं उचलली गेली नाहीत, तर खेळाडू स्वत:च खेळायला नकार देतील. टीमच्या कामगिरीमुळे मी अजिबात निराश नाही.'

'ही तीच टीम आहे, ज्यांनी मागच्या 5 वर्षांमध्ये जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात विजय मिळवला. ऑस्ट्रेलियात दोनवेळा टेस्ट सीरिज जिंकणं आणि इंग्लंडमध्ये आघाडी घेणं शानदार होतं. 70 वर्षांमध्ये कोणालाही ऑस्ट्रेलियात असं करता आलं नव्हतं,' अशी प्रतिक्रिया शास्त्रींनी दिली. भारताने लागोपाठ दोनवेळा ऑस्ट्रेलियाच ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिजमध्ये पराभव केला, तर इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिजमध्ये 2-1 ने आघाडी घेतली.

'याशिवाय टीमने मर्यादित ओव्हरमध्येही विजय मिळवले. वेस्ट इंडिज, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये टीम जिंकली. मी कोच म्हणून काही विचार घेऊन आलो होतो, यातल्या बहुतेक गोष्टी मिळवता आल्या,' असं वक्तव्य शास्त्रींनी केलं. रवी शास्त्री कोच असताना टीमला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही. आता रवी शास्त्री यांची जागा राहुल द्रविड घेणार आहे. 17 नोव्हेंबरपासून न्यूझीलंडच्या भारत दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या सीरिजपासून द्रविड टीम इंडियाचा प्रशिक्षक असेल.

First published:

Tags: Ravi shastri, T20 world cup, Team india