• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup : न्यूझीलंडच्या विजयानंतर भारताची Exit, NZ vs AFG मॅच संपताच टीम इंडियाचा धक्कादायक निर्णय

T20 World Cup : न्यूझीलंडच्या विजयानंतर भारताची Exit, NZ vs AFG मॅच संपताच टीम इंडियाचा धक्कादायक निर्णय

टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) सुपर-12 स्टेजमधूनच टीम इंडिया (Team India) आऊट झाली आहे. रविवारी दुपारी झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा (New Zealand vs Afghanistan) पराभव केला, त्याचबरोबर भारताचं सेमी फायनलला पोहोचण्याचं स्वप्नही भंगलं.

 • Share this:
  दुबई, 7 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) सुपर-12 स्टेजमधूनच टीम इंडिया (Team India) आऊट झाली आहे. रविवारी दुपारी झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा (New Zealand vs Afghanistan) पराभव केला, त्याचबरोबर भारताचं सेमी फायनलला पोहोचण्याचं स्वप्नही भंगलं. आता सोमवारी टीम इंडियाचा सामना दुबळ्या नामिबियाविरुद्ध (India vs Namibia) होणार आहे, पण सेमी फायनलचं आव्हान संपुष्टात आल्यामुळे या मॅचला काहीच अर्थ उरलेला नाही. न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानचा सामना संपल्यानंतर टीम इंडियाने नामिबियाविरुद्धच्या मॅचआधी सरावाला नकार दिला आहे. दुबईमधल्या आयसीसी क्रिकेट अकॅडमीममध्ये टीम इंडियाचा ऐच्छिक सराव होता, पण मॅचच्या निकालानंतर टीमने हा सराव रद्द केला. मागचं वर्षभर टीम इंडिया क्रिकेट खेळत आहे. जून महिन्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी टीम इंडिया इंग्लंडला रवाना झाली. यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात टेस्ट सीरिज झाली. या सीरिजनंतर टीम इंडिया आयपीएल खेळण्यासाठी इंग्लंडहून युएईला रवाना झाली. आयपीएल संपल्यानंतर लगेचच वर्ल्ड कपला सुरुवात झाली. आता वर्ल्ड कपनंतर लगेचच 17 नोव्हेंबरपासून न्यूझीलंडच्या भारत दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात तीन टी-20 आणि दोन टेस्ट मॅचची सीरिज होणार आहे. नामिबियाविरुद्धचा सामना विराट कोहलीचा टी-20 कॅप्टन म्हणून अखेरचा असेल. वर्ल्ड कप सुरू व्हायच्या आधीच विराट कोहलीने आपण टी-20 फॉरमॅटची कॅप्टन्सी सोडणार असल्याचं जाहीर केलं. आता टी-20 साठी टीम इंडियाचा कॅप्टन कोण असणार, याची उत्सुकता आहे. याचसोबत निवड समितीला टी-20 सीरिजसाठीची टीमही घोषित करायची आहे. हार्दिक पांड्या, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांची कामगिरी निराशाजनक झाली आहे, त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजमधून या चौघांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे.
  Published by:Shreyas
  First published: