मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup : ...तरच टीम इंडिया सेमी फायनलमध्ये पोहोचणार, कठीण झालं गणित

T20 World Cup : ...तरच टीम इंडिया सेमी फायनलमध्ये पोहोचणार, कठीण झालं गणित

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाची (Team India) निराशाजनक कामगिरी सुरूच आहे. पाकिस्तानविरुद्ध 10 विकेटने पराभव झाल्यानंतर आता न्यूझीलंडनेही भारताचा 8 विकेटने पराभव केला.

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाची (Team India) निराशाजनक कामगिरी सुरूच आहे. पाकिस्तानविरुद्ध 10 विकेटने पराभव झाल्यानंतर आता न्यूझीलंडनेही भारताचा 8 विकेटने पराभव केला.

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाची (Team India) निराशाजनक कामगिरी सुरूच आहे. पाकिस्तानविरुद्ध 10 विकेटने पराभव झाल्यानंतर आता न्यूझीलंडनेही भारताचा 8 विकेटने पराभव केला.

दुबई, 31 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाची (Team India) निराशाजनक कामगिरी सुरूच आहे. पाकिस्तानविरुद्ध 10 विकेटने पराभव झाल्यानंतर आता न्यूझीलंडनेही भारताचा 8 विकेटने पराभव केला. भारताने दिलेलं 112 रनचं आव्हान किवी टीमने 14.3 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. दोन्ही सामन्यांमध्ये एवढा मोठा पराभव झाल्यामुळे टीम इंडियाचा नेट रन रेट अत्यंत खराब झाला आहे, त्यामुळे सेमी फायनलमध्ये पोहोचण्याचं टीम इंडियाचं स्वप्न आणखी कठीण झालं आहे. सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला आता स्वत:सोबतच दुसऱ्यांच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागणार आहे.

दुसऱ्या ग्रुपच्या पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडिया 6 टीममध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. अफगाणिस्तान आणि नामिबियाची टीमही भारताच्या पुढे आहे, तर स्कॉटलंड भारताच्या मागे शेवटच्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानने त्यांचे तीन पैकी तीन सामने जिंकले आहेत, त्यामुळे त्यांचं सेमी फायनलला पोहोचणं जवळपास निश्चित झालं आहे. दुसऱ्या ग्रुपमध्ये पाकिस्तानची टीम पहिल्या क्रमांकावर आहे.

अफगाणिस्तानने 3 पैकी 2 मॅच जिंकल्यामुळे ते 4 पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. न्यूझीलंड आणि नामिबियाने 2 पैकी 1 मॅच जिंकल्या आहेत. पण न्यूझीलंडचा नेट रनरेट चांगला असल्यामुळे ते तिसऱ्या आणि नामबिया चौथ्या क्रमांकावर आहे. भारत आणि स्कॉटलंडने त्यांच्या सुरुवातीच्या दोन्ही मॅच गमावल्या आहेत. भारताचा नेट रनरेट -1.609 आहे.

भारताचं भवितव्य अफगाणिस्तानच्या हाती?

भारत आणि न्यूझीलंडचे उरलेले सामने अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाविरुद्ध आहेत. कागदावर स्कॉटलंड आणि नामबियाच्या टीम दुबळ्या आहेत, तर अफगाणिस्तानमध्ये मोठा उलटफेर करण्याची शक्यता आहे. भारताने उरलेले तिन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकले आणि न्यूझीलंडचा अफगाणिस्तानविरुद्ध पराभव झाला, तरच नेट रन रेटच्या माध्यमातून टीम इंडिया सेमी फायनलला पोहोचू शकते.

भारताचे उरलेले सामने

3 नोव्हेंबर- भारत विरुद्ध अफगाणिस्तान सायंकाळी 7: 30 वाजता

5 नोव्हेंबर- भारत विरुद्ध स्कॉटलंड सायंकाळी 7: 30 वाजता

8 नोव्हेंबर- भारत विरुद्ध नामिबिया सायंकाळी 7: 30 वाजता

First published:

Tags: T20 world cup, Team india