• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup : श्रीलंकेच्या हसरंगाने इतिहास घडवला, वनडेनंतर आता टी-20 मध्येही हॅट्रिक!

T20 World Cup : श्रीलंकेच्या हसरंगाने इतिहास घडवला, वनडेनंतर आता टी-20 मध्येही हॅट्रिक!

श्रीलंकेच्या वानिंदु हसरंगाने (Wanindu Hasaranga Hattrick) टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) हॅट्रिक घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (Sri Lanka vs South Africa) मॅचमध्ये हसरंगाने हा विक्रम केला आहे.

 • Share this:
  शारजाह, 30 ऑक्टोबर : श्रीलंकेच्या वानिंदु हसरंगाने (Wanindu Hasaranga Hattrick) टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) हॅट्रिक घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (Sri Lanka vs South Africa) मॅचमध्ये हसरंगाने हा विक्रम केला आहे. श्रीलंकेचा लेग स्पिनर असलेल्या हसरंगाने दोन ओव्हरमध्ये हॅट्रिक पूर्ण केली, पण या हॅट्रिकनंतरही श्रीलंकेला पराभवाचा सामना करावा लागला. याआधी आयर्लंडचा फास्ट बॉलर कुर्तीस कॅम्फरने  (Curtis Campher) नेदरलँड्सविरुद्ध चार बॉलमध्ये चार विकेट घेतल्या होत्या. या सामन्यात श्रीलंकेने 142 रन केल्या होत्या, पण दक्षिण आफ्रिकेने एक बॉल शिल्लक ठेवत 6 विकेट गमावून ही मॅच जिंकली. वानिंदु हसरंगाने 15 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर एडन मार्करमला आऊट केलं, यानंतर तो 18 व्या ओव्हरला बॉलिंगसाठी आला. पहिल्याच बॉलला त्याने टेम्बा बऊमाला आणि मग दुसऱ्या बॉलवर ड्वॅन प्रिटोरियसला आऊट केलं, अशाप्रकारे त्याची हॅट्रिक पूर्ण झाली. याआधी 2007 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर ब्रेट लीने बांगलादेशविरुद्ध हॅट्रिक घेतली होती. हसरंगाने वनडेमध्येही हॅट्रिक घेतली आहे. वानिंदु हसरंगा टी-20 आणि वनडेमध्ये हॅट्रिक घेणारा जगातला चौथा बॉलर आहे. याआधी श्रीलंकेच्याच लसिथ मलिंगा, थिसारा परेरा आणि ब्रेट ली यांनी हा विक्रम केला होता. क्रिकेटच्या दोन्ही फॉरमॅटमध्ये हॅट्रिक घेणारा हसरंगा श्रीलंकेचा तिसरा खेळाडू बनला आहे. आयपीएलमध्ये हसरंगा विराट कोहलीच्या आरसीबीमध्ये होता, पण त्याला जास्त संधी मिळाली नाही. श्रीलंकेचा सुपर-12 च्या तीन सामन्यांमधला हा दुसरा पराभव आहे, त्यामुळे टीम सेमी फायनलमध्ये पोहोचण्याची शक्यता कमी आहे. श्रीलंकेने 2014 साली टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता, पण मागच्या काही काळापासून टीमची कामगिरी निराशाजनक झाली आहे. T20 World Cup : हसरंगाची हॅट्रिक पाण्यात, मिलरने केलं 'लंका' दहन, दक्षिण आफ्रिकेचा रोमांचक विजय
  Published by:Shreyas
  First published: