• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup : बांगलादेशला हरवून दक्षिण आफ्रिकेची हॅट्रिक, ऑस्ट्रेलिया टेन्शनमध्ये!

T20 World Cup : बांगलादेशला हरवून दक्षिण आफ्रिकेची हॅट्रिक, ऑस्ट्रेलिया टेन्शनमध्ये!

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) दक्षिण आफ्रिकेची शानदार कामगिरी सुरूच आहे. अबु धाबीमध्ये झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशचा (South Africa vs Bangladesh) 6 विकेटने पराभव केला.

 • Share this:
  अबु धाबी, 2 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) दक्षिण आफ्रिकेची शानदार कामगिरी सुरूच आहे. अबु धाबीमध्ये झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशचा (South Africa vs Bangladesh) 6 विकेटने पराभव केला. आफ्रिकेचा सुपर-12 मधला हा लागोपाठ तिसरा विजय आहे, त्यामुळे 6 पॉईंट्ससह टीम ग्रुप-1 मध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. या मॅचमध्ये बांगलादेशने पहिले बॅटिंग करत फक्त 84 रन केले. या आव्हानाचा पाठलाग दक्षिण आफ्रिकेने 13.3 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून केला. या ग्रुपमध्ये इंग्लंडच्या टीमने 4 पैकी 4 सामने जिंकत 8 पॉईंट्स खिशात टाकले आहेत, त्यामुळे इंग्लंडची (England) टीम आधीच सेमी फायनलला क्वालिफाय झाली आहे. आता दुसऱ्या स्थानासाठी दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात रेस आहे. जर दक्षिण आफ्रिकेने शनिवारी इंग्लंडचा पराभव केला, तर ऑस्ट्रेलियाच्या अडचणी वाढतील, कारण कांगारूंचा नेट रनरेट दक्षिण आफ्रिकेपेक्षा कमी आहे. बांगलादेशने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. रिझा हेंड्रिक्स पहिल्याच ओव्हरमध्ये 4 रन करून तस्कीन अहमदच्या बॉलिंगवर आऊट झाला. क्विंटन डिकॉकला मेहदी हसनने 16 रनवर आऊट केलं. एडन मार्करम एकही रन न करता पॅव्हेलियनमध्ये परतला. दक्षिण आफ्रिकेने 33 रनवर 3 विकेट गमावल्या होत्या, पण कर्णधार टेम्बा बऊमाने नाबाद 31 रन आणि रस्सी व्हॅन डर डुसेनने 22 रन करून दक्षिण आफ्रिकेचा विजय पक्का केला. डुसेनला नसुम अहमदने आऊट केलं. बऊमासोबत मिलरने नाबाद 5 रन केले. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बऊमाने या मॅचमध्ये टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. कागिसो रबाडा एनरिच नॉर्किया यांनी शानदार बॉलिंग करत बांगलादेशचा 18.2 ओव्हरमध्ये 84 रनवर ऑल आऊट केला. रबाडाने 20 रन देऊन 3 विकेट घेतल्या, तर नॉर्कियाने 8 रन देऊन 3 विकेट मिळवल्या. तबरेझ शम्सीला 2 विकेट घेण्यात यश आलं. बांगलादेशच्या फक्त तीनच खेळाडूंना दोन अंकी स्कोअर करता आला. मेहेदी हसनने सर्वाधिक 27 रन केले, तर लिटन दासने 24 आणि शमीम हुसेनने 11 रन केले. बांगलादेशचा सुपर-12 मधला हा लागोपाठ चौथा पराभव आहे, त्यामुळे बांगलादेश सेमी फायनलच्या रेसमधून बाहेर झालं आहे.
  Published by:Shreyas
  First published: