मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup : दोन वेळच्या चॅम्पियन वेस्ट इंडिजला डबल धक्का, सेमी फायनलचा मार्ग आणखी खडतर

T20 World Cup : दोन वेळच्या चॅम्पियन वेस्ट इंडिजला डबल धक्का, सेमी फायनलचा मार्ग आणखी खडतर

 सर्वाधिक दोन वेळा टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) जिंकलेल्या वेस्ट इंडिजला (West Indies) यंदाच्या स्पर्धेत मात्र डबल धक्का बसला आहे.

सर्वाधिक दोन वेळा टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) जिंकलेल्या वेस्ट इंडिजला (West Indies) यंदाच्या स्पर्धेत मात्र डबल धक्का बसला आहे.

सर्वाधिक दोन वेळा टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) जिंकलेल्या वेस्ट इंडिजला (West Indies) यंदाच्या स्पर्धेत मात्र डबल धक्का बसला आहे.

  • Published by:  Shreyas

दुबई, 26 ऑक्टोबर : सर्वाधिक दोन वेळा टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) जिंकलेल्या वेस्ट इंडिजला (West Indies) यंदाच्या स्पर्धेत मात्र डबल धक्का बसला आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात 6 विकेटने पराभव झाल्यानंतर आता वेस्ट इंडिजचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (West Indies vs South Africa) 8 विकेटने पराभव झाला आहे. या पराभवामुळे वेस्ट इंडिजचा सेमी फायनलला पोहोचण्याचा मार्ग आणखी खडतर झाला आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बऊमा याने टॉस जिंकून वेस्ट इंडिजला पहिले बॅटिंगसाठी बोलावलं.

पहिले बॅटिंग करत वेस्ट इंडिजने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 143 रन केले. एव्हिन लुईसने 35 बॉलमध्ये 56 रनची खेळी केली, तर कर्णधार कायरन पोलार्ड 26 रन करून आऊट झाला. दक्षिण आफ्रिकेकडून प्रिटोरियसने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर केशव महाराजला 2, एनरिक नॉर्किया आणि रबाडाला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. नॉर्कियाने त्याच्या 4 ओव्हरमध्ये फक्त 14 रन दिल्यामुळे त्याला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.

वेस्ट इंडिजने दिलेल्या 144 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना एडन मार्करमने 26 बॉलमध्ये नाबाद 51 रन केले. तर व्हॅनडर डुसेन नाबाद 43 रनवर राहिला. दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या इनिंगमध्ये दोन विकेट गमावल्या.

वेस्ट इंडिजचे उरलेले सामने आता बांगलादेश, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहेत. सेमी फायनलला पोहोचण्यासाठी वेस्ट इंडिजला आता उरलेल्या तिन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवणं गरजेचं आहे. पहिल्या ग्रुपमध्ये असलेली वेस्ट इंडिज पॉईंट्स टेबलमध्ये अखेरच्या क्रमांकावर आहे. तसंच त्यांचा नेट रनरेट -2.550 एवढा आहे, त्यामुळे सेमी फायनलमध्ये जाण्यासठी वेस्ट इंडिजला उरलेल्या तिन्ही मॅच मोठ्या फरकाने जिंकून नेट रनरेटही सुधारावा लागणार आहे.

T20 World Cup मध्ये नवा वाद, आफ्रिकेच्या डिकॉकची शेवटच्या क्षणी माघार, धक्कादायक कारण

वेस्ट इंडिजचं वेळापत्रक (West Indies Schedule)

23 ऑक्टोबर- इंग्लंडविरुद्ध 6 विकेटने पराभव

26 ऑक्टोबर- दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 8 विकेटने पराभव

29 ऑक्टोबर- वेस्ट इंडिज विरुद्ध बांगलादेश- दुपारी 3.30 वाजता

4 नोव्हेंबर- वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंका- संध्याकाळी 7.30 वाजता

First published:

Tags: South africa, T20 world cup, West indies