मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup च्या महामुकाबल्यासाठी शोएब अख्तर तयार, भारत-पाकिस्तान सामन्याआधी कपिल-गावसकरांना मसाज!

T20 World Cup च्या महामुकाबल्यासाठी शोएब अख्तर तयार, भारत-पाकिस्तान सामन्याआधी कपिल-गावसकरांना मसाज!

टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) आजपासून ओमान आणि युएईमध्ये सुरुवात झाली आहे, पण तरीही चाहत्यांना उत्सुकता लागली आहे ती 24 ऑक्टोबरला होणाऱ्या भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) महामुकाबल्याची.

  • Published by:  Shreyas
मुंबई, 17 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) आजपासून ओमान आणि युएईमध्ये सुरुवात झाली आहे, पण तरीही चाहत्यांना उत्सुकता लागली आहे ती 24 ऑक्टोबरला होणाऱ्या भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) महामुकाबल्याची. या मॅचपासूनच भारत-पाकिस्तान आपल्या वर्ल्ड कप अभियानाला सुरुवात करणार आहेत. या सामन्याआधी पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) ट्विटरवर एक फोटो शेयर केला आहे. या फोटोमध्ये शोएब भारताचे महान क्रिकेटपटू सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) आणि कपिल देव (Kapil Dev) यांच्यासोबत मस्ती करताना दिसत आहे. या फोटोमध्ये पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू झहीर अब्बासही (Zaheer Abbas) दिसत आहेत. 'बेस्ट ऑफ बेस्ट खेळाडूंसोबत मजा करत आहे. महान झहीर अब्बास, सुनिल गावसकर आणि कपिल देव. आम्ही क्रिकेटच्या महामुकाबल्यासाठी पूर्णपणे तयार आहोत,' असं कॅप्शन शोएबने या फोटोला दिलं. शोएबने जो फोटो शेयर केला त्यात तो गावसकर आणि कपिल देव यांच्या खांद्याला मसाज करत आहे. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाले आहेत. पाकिस्तान अजूनही विजयाच्या प्रतिक्षेत भारत-पाकिस्तानची टीम दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच आमने-सामने असतील. या आधी दोघांमध्ये 2019 वर्ल्ड कपमध्ये लढत झाली होती. त्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे. टी-20 आणि वनडे वर्ल्ड कपमध्ये भारताचा आतापर्यंत कधीच पाकिस्तानविरुद्ध पराभव झालेला नाही. टी-20 वर्ल्ड कपमध्ये या दोन्ही टीम पाचवेळा एकमेकांसमोर होत्या, या पाचही वेळा भारताचा विजय झाला. 2007 टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकिस्तानचा लीग स्टेजमध्ये आणि फायनलमध्ये पराभव केला. यानंतर 2012, 2014 आणि 2016 सालीही टीम इंडिया विजयी झाली. 2016 टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने पहिले बॅटिंग करत 5 विकेट गमावून 118 रन केल्या होत्या. भारताने हे आव्हान 4 विकेट गमावून पूर्ण केलं. भारत-पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 8 टी-20 मॅच झाल्या यातल्या 7 मॅचमध्ये भारताचा विजय झाला.
First published:

Tags: Shoaib akhtar, Sunil gavaskar, T20 world cup

पुढील बातम्या