Home /News /sport /

T20 World Cup : टीम इंडिया सेमी फायनलला पोहोचणार? या टीम ठरवणार!

T20 World Cup : टीम इंडिया सेमी फायनलला पोहोचणार? या टीम ठरवणार!

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) ग्रुपची घोषणा आयसीसीने (ICC) केली आहे. टीम इंडियाचा समावेश ग्रुप-2 मध्ये करण्यात आला आहे.

    मुंबई, 16 जुलै : ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) ग्रुपची घोषणा आयसीसीने (ICC) केली आहे. टीम इंडियाचा समावेश ग्रुप-2 मध्ये करण्यात आला आहे. या टीममध्ये भारताबरोबरच पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानचा समावेश आहे. याचसोबत ग्रुप ए ची उपविजेती टीम आणि ग्रुप बीची विजयी टीम सहभागी होतील. टी-20 वर्ल्ड कपमध्ये सुरुवातीला ग्रुप ए आणि ग्रुप बी च्या टीम क्वालिफिकेशन राऊंडमध्ये खेळतील. यातल्या प्रत्येक ग्रुपमधल्या 2 अशा 4 टीम ग्रुप-1 आणि ग्रुप-2 मध्ये प्रवेश करतील. टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये पोहोचायचं असेल तर 5 सामन्यांपैकी कमीत कमी 3 मॅच जिंकाव्या लागणार आहेत. या ग्रुपमध्ये बघितलं तर पाकिस्तान आणि न्यूझीलंड या दोन दिग्गज टीम आहेत. भारताने पाकिस्तानविरुद्ध (India vs Pakistan) वर्ल्ड कपमधली एकही मॅच गमावलेली नाही, तर दुसरीकडे टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताला न्यूझीलंडविरुद्ध एकही सामना जिंकता आलेला नाही. अफगाणिस्तानची टीम कागदावर कमकुवत वाटत असली तरी त्यांच्या टीममधले अनेक खेळाडू जगभरातल्या टी-20 लीगमध्ये खेळतात. यामध्ये राशिद खान, मोहम्मद नबी, मुजीबुर रहमान या खेळाडूंचा समावेश आहे. तसंच क्वालिफायिंग राऊंडमधून येणाऱ्या उरलेल्या दोन टीम श्रीलंका आणि बांगलादेश असण्याची शक्यता आहे. Men's T20WC 2021– Groups श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानची गेल्या काही वर्षांमधली कामगिरी आणि भारताचं पाकिस्तानविरुद्धचं रेकॉर्ड बघता टीम इंडियाची ग्रुप स्टेजमधली सगळ्यात कठीण मॅच न्यूझीलंडविरुद्ध होईल, असं चित्र सध्या तरी दिसत आहे. ग्रुप-2 मधल्या टीम जर त्यांच्या रेकॉर्डनुसार खेळल्या तर टीम इंडियाचं सेमी फायनलला पोहोचणं सोपं होईल. टीम इंडियासाठी ग्रुप-2 सोपा वाटत असला, तरी ग्रुप-1 मध्ये तगडी स्पर्धा आहे. ग्रुप-1 मधल्या 6 टीमपैकी इंग्लंड, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या 4 तगड्या टीम आहेत. या सगळ्या टीमचं गेल्या काही वर्षांमधलं रेकॉर्ड बघता इंग्लंड आणि वेस्ट इंडिजची टीम सेमी फायनलला पोहोचतील, त्यामुळे टीम इंडियाला सेमी फायनलध्ये या दोघांपैकी एका टीमचा सामना करावा लागू शकतो. याआधी 2016 साली झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजने भारताचा सेमी फायनलमध्येच पराभव केला होता. फायनलमध्ये अखेरच्या ओव्हरमध्ये कार्लोस ब्रॅथवेटने बेन स्टोक्सला ऐतिहासिक 4 सिक्स मारल्या, यामुळे वेस्ट इंडिजने दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket, T20 world cup, Team india

    पुढील बातम्या