मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup : इतिहासाची पुनरावृत्ती, वर्ल्ड कप मॅच आणि ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान, 21 वर्षांपूर्वी काय झालं होतं?

T20 World Cup : इतिहासाची पुनरावृत्ती, वर्ल्ड कप मॅच आणि ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान, 21 वर्षांपूर्वी काय झालं होतं?

टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup Semi Final) सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला (Australia vs Pakistan) पराभवाचा धक्का दिला आहे.

टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup Semi Final) सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला (Australia vs Pakistan) पराभवाचा धक्का दिला आहे.

टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup Semi Final) सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला (Australia vs Pakistan) पराभवाचा धक्का दिला आहे.

दुबई, 12 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup Semi Final) सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला (Australia vs Pakistan) पराभवाचा धक्का दिला आहे. पाकिस्तानने दिलेलं 177 रनचं आव्हान ऑस्ट्रेलियाने 5 विकेट आणि एक ओव्हर राखून पार केलं. मॅथ्यू वेड आणि मार्कस स्टॉयनिस ऑस्ट्रेलियाच्या या विजयाचे शिल्पकार ठरले. मॅथ्यू वेडने (Mathew Wade) 17 बॉलमध्ये नाबाद 41 रन केले, यामध्ये 4 सिक्स आणि 2 फोरचा समावेश होता. तर मार्कस स्टॉयनिसने (Marcus Stoinis) 31 बॉलमध्ये 40 रन केले. वॉर्नर (David Warner) 30 बॉलमध्ये 49 रन करून आऊट झाला.

पाकिस्तानने या मॅचवर आपली पकड मजबूत केली होती, पण 19 व्या ओव्हरला झालेली एक चूक त्यांना चांगलीच महागात पडली. ऑस्ट्रेलियाला अखेरच्या दोन ओव्हरमध्ये विजयासाठी 22 रनची गरज होती, तेव्हा बाबर आझमने बॉल शाहीन आफ्रिदीच्या (Shaheen Afridi) हातात दिला. पहिल्या दोन बॉलला आफ्रिदीने फक्त तीन रन दिले. यानंतर तिसऱ्या बॉलला मॅथ्यू वेडने सिक्स मारण्यासाठी मोठा शॉट खेळला, पण बाऊंड्री लाईनवर उभ्या असलेल्या हसन अलीने (Hasan Ali) त्याचा कॅच सोडला. या बॉलला मॅथ्यू वेडने दोन रन काढत पुन्हा स्ट्राईक घेतली. यानंतर पुढच्या तिन्ही बॉलला सिक्स मारत वेडने ऑस्ट्रेलियाला फायनलमध्ये पोहोचवलं.

एका कॅचमुळे वर्ल्ड कपची मॅच फिरल्याची ही काही पहिलीच घटना नाही. याआधी 21 वर्षांपूर्वी 1999 च्या वर्ल्ड कपमध्येही (1999 World Cup) अशीच घटना घडली होती. 1999 सालच्या सुपर-6 स्टेजमध्ये ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका (Australia vs South Africa) सामन्यात हर्षल गिब्जने (Herschelle Gibbs) स्टीव्ह वॉचा (Steve Waugh) कॅच पकडला होता, पण ठराविक क्षण बॉल हातात न ठेवता गिब्जने जल्लोष केला, त्यामुळे स्टीव्ह वॉला नॉट आऊट देण्यात आलं, त्यावेळी वॉ 56 रनवर खेळत होता. 272 रनचा पाठलाग करण्यासाठी वॉ बॅटिंगला आला तेव्हा ऑस्ट्रेलियाची अवस्था 48/3 अशी होती. गिब्जने कॅच सोडल्यानंतर वॉने नाबाद 120 रनची खेळी केली.

यानंतर सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका पुन्हा आमने-सामने आले. हा सामना टाय झाला होता, पण सुपर-6 मध्ये ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवल्यामुळे ऑस्ट्रेलियाला फायनलचं तिकीट मिळालं. यानंतर फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला धूळ चारली. हर्षल गिब्जच्या त्या एका कॅचच्या चुकीमुळे ऑस्ट्रेलियाने 1999 सालचा वर्ल्ड कप जिंकला होता.

First published:
top videos

    Tags: T20 world cup