मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup : AUS vs PAK मध्ये कोण जिंकणार? लाराची दुसरी भविष्यवाणीही खरी ठरणार!

T20 World Cup : AUS vs PAK मध्ये कोण जिंकणार? लाराची दुसरी भविष्यवाणीही खरी ठरणार!

जगातल्या सगळ्यात महान खेळाडूपैकी एक असलेल्या वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराने (Brian Lara) टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup Semi Final) दुसऱ्या सेमी फायनलबाबत भविष्यवाणी केली आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया (Pakistan vs Australia) यांच्यात दुबईच्या मैदानात हा सामना होणार आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas
दुबई, 11 नोव्हेंबर : जगातल्या सगळ्यात महान खेळाडूपैकी एक असलेल्या वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराने (Brian Lara) टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup Semi Final) दुसऱ्या सेमी फायनलबाबत भविष्यवाणी केली आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया (Pakistan vs Australia) यांच्यात दुबईच्या मैदानात हा सामना होणार आहे. न्यूझीलंडने पहिल्या सेमी फायनलमध्ये इंग्लंडचा (England vs New Zealand) 5 विकेटने पराभव करत आधीच फायनलमध्ये प्रवेश केला आहे. ब्रायन लाराने एक ट्वीट करत दुसरी सेमी फायनल कोण जिंकणार हे सांगितलं आहे. याआधी लाराने केलेली न्यूझीलंडच्या विजयाची भविष्यवाणीही खरी ठरली होती. 'ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान मॅच, या सामन्यात पाकिस्तानचा विजय होईल, असं मला वाटतं. ऑस्ट्रेलिया धोकादायक टीम आहे, त्यांचे खेळाडू बघितले की ते कोणत्याही टीमला हरवू शकतात. पाकिस्तानकडेही शानदार बॉलर आणि बॅटर आहेत, जे टीमला फायनलमध्ये पोहोचवू शकतात,' असं लारा त्याच्या ट्वीटमध्ये म्हणाला. brian lara on t20 world cup 2021 semi final याआधी लाराने न्यूझीलंडच्या विजयाचं वर्तवलेलं भाकीतही खरं निघालं होतं. माझं मत न्यूझीलंड जिंकेल, इंग्लंड आणि न्यूझीलंडने टी-20 वर्ल्ड कपमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. न्यूझीलंडची बॅटिंगची रणनिती त्यांच्यासाठी चांगली ठरली. इंग्लंड मात्र बटलरवर प्रमाणाबाहेर अवलंबून आहे, असं ट्वीट लाराने न्यूझीलंड-इंग्लंडविरुद्धच्या मॅचआधी केलं होतं. 10 नोव्हेंबरला झालेल्या सेमी फायनलमध्ये इंग्लंडने टॉस गमावला, यानंतर न्यूझीलंडने त्यांना बॅटिंगला पाठवलं. पहिले बॅटिंग करत इंग्लंडला 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 166 रन करता आले. अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने या आव्हानाचा पाठलाग 19 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून केला. ओपनर डॅरेल मिचेलने 47 बॉलमध्ये नाबाद 72 रन करत विजयी फोर मारला. या कामगिरीबद्दल त्याला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. याशिवाय डेवॉन कॉनवेने 38 बॉलमध्ये 46 आणि जेम्स नीशमने 11 बॉलमध्ये 27 रन केले.
First published:

Tags: T20 world cup

पुढील बातम्या