मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup : न्यूझीलंडच्या मिचलने मॅचच नाही मनही जिंकलं, अटीतटीच्या वेळी नाकारली रन, कारण...

T20 World Cup : न्यूझीलंडच्या मिचलने मॅचच नाही मनही जिंकलं, अटीतटीच्या वेळी नाकारली रन, कारण...

टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup Semi Final)सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडने इंग्लंडवर (England vs New Zealand) थरारक विजय मिळवला. डॅरेल मिचेल (Daryl Mitchell) आणि जेम्स नीशम (James Neesham) न्यूझीलंडच्या विजयाचे शिल्पकार ठरले.

  • Published by:  Shreyas
अबु धाबी, 11 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup Semi Final)सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडने इंग्लंडवर (England vs New Zealand) थरारक विजय मिळवला. डॅरेल मिचेल (Daryl Mitchell) आणि जेम्स नीशम (James Neesham) न्यूझीलंडच्या विजयाचे शिल्पकार ठरले. मिचेलने 47 बॉलमध्ये नाबाद 72 रन केले, यामध्ये 4 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. तर जेम्स नीशमने 11 बॉलमध्ये 27 रनची आक्रमक खेळी केली. नीशमने 3 सिक्स आणि एक फोर लगावले. शेवटच्या 4 ओव्हरमध्ये न्यूझीलंडला विजयासाठी 57 रनची गरज होती, तेव्हा नीशम आणि मिचेलने इंग्लंडच्या बॉलिंगवर आक्रमण करत मॅच जिंकली आणि फायनलमध्ये प्रवेश केला. या सामन्यात डॅरेल मिचेल फक्त न्यूझीलंडला जिंकवलच नाही तर त्याने चाहत्यांचं मनही जिंकलं. 18 व्या ओव्हरमध्ये सामना अटीतटीचा सुरू असताना मिचेलने रन नाकरली कारण त्याची आणि इंग्लंडचा लेग स्पिनर आदिल रशीद यांची टक्कर झाली होती. मी आदिल रशीद बॉल अडवण्यासाठी गेला तेव्हा त्याच्या मध्ये आलो. माझी चूक होती, असं मला वाटलं. कोणताही वाद होऊ नये म्हणून मी रन घ्यायचं नाकारलं, असं मिचेल मॅच संपल्यानंतर म्हणाला. मला खिलाडूवृत्तीने खेळायचं होतं, म्हणून मी ती रन धावलो नाही, नशीब आमच्या बाजूने होतं. कारण आम्ही सामना गमावला असता, तर ती एक रन न काढणं महागात पडलं असतं. सुदैवाने आम्ही मॅच जिंकलो, अशी प्रतिक्रिया मिचेलने दिली. न्यूझीलंडचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळणं हे मी माझं भाग्य समजतो. 7-8 वर्ष स्थानिक क्रिकेट खेळण्याचा फायदा मला झाला, असं मिचेलने सांगितलं. केन विलियमसनच्या नेतृत्वात गेल्या काही वर्षांमध्ये न्यूझीलंडची कामगिरी उत्कृष्ट झाली आहे. न्यूझीलंडची टीम 2019 वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचली होती, तसंच यावर्षी झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्येही न्यूझीलंडचा विजय झाला होता. आता किवी टीम टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचली आहे. टी-20 वर्ल्ड कपची दुसरी सेमी फायनल आज पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये होणार आहे. या सामन्यात ज्या टीमचा विजय होईल ती न्यूझीलंडविरुद्ध रविवारी टी-20 वर्ल्ड कपची फायनल खेळेल.
First published:

Tags: T20 world cup

पुढील बातम्या