Home /News /sport /

T20 World Cup : '...मग आम्ही बुर्ज खलिफा बघायला आलो का?', भारतीय क्रिकेटपटूकडून पीटरसनची बोलती बंद!

T20 World Cup : '...मग आम्ही बुर्ज खलिफा बघायला आलो का?', भारतीय क्रिकेटपटूकडून पीटरसनची बोलती बंद!

टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये (T20 World Cup Semi Final) न्यूझीलंडने इंग्लंडला (England vs New Zealand) पराभवाचा धक्का दिला. या पराभवानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने (Wasim Jaffer) इंग्लंडच्या केव्हिन पीटरसनला (Kevin Pietersen) ट्रोल केलं आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 11 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये (T20 World Cup Semi Final) न्यूझीलंडने इंग्लंडला (England vs New Zealand) पराभवाचा धक्का दिला. 2019 चा वनडे वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टी-20 वर्ल्ड कपमध्येही इंग्लंड विजयाची फेवरेट होती. सुपर-12 स्टेजमध्येही इंग्लंडने धमाकेदार कामगिरी केली होती, पण सेमी फायनलमध्ये किवी टीमने इंग्लंडला पराभवाची धूळ चारली. या पराभवानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने (Wasim Jaffer) इंग्लंडच्या केव्हिन पीटरसनला (Kevin Pietersen) ट्रोल केलं आहे. बुधवारी झालेल्या पहिल्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडने इंग्लंडचा 5 विकेटने पराभव करत पहिल्यांदाच टी-20 वर्ल्ड कपची सेमी फायनल गाठली. अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियममध्ये न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर न्यूझीलंडच्या बॉलर्सनी इंग्लंडला 20 ओव्हरमध्ये 166 रनवर रोखलं. इंग्लंडच्या या आव्हानाचा पाठलाग न्यूझीलंडने 19 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून पार केलं. न्यूझीलंडचा ओपनर डॅरेल मिचेलने 47 बॉलमध्ये नाबाद 72 रन केले, यामध्ये 4 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. तर जेम्स नीशमने 11 बॉलमध्ये 27 रनची आक्रमक खेळी केली. नीशमने 3 सिक्स आणि एक फोर लगावले. शेवटच्या 4 ओव्हरमध्ये न्यूझीलंडला विजयासाठी 57 रनची गरज होती, तेव्हा नीशम आणि मिचेलने इंग्लंडच्या बॉलिंगवर आक्रमण करत मॅच जिंकली आणि फायनलमध्ये प्रवेश केला. पीटरसनने 2 नोव्हेंबरला एक ट्वीट केलं होतं. 'या टी-20 वर्ल्ड कपमध्ये फक्त पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान इंग्लंडला हरवू शकतं. पण फक्त हा सामना शारजाहच्या वापरलेल्या खेळपट्टीवर झाला पाहिजे. अन्यथा इंग्लंड ट्रॉफी जिंकेल, जसं सध्या ईपीएलमध्ये चेल्सीला ट्रॉफी मिळाली पाहिजे,' असं ट्वीट पीटरसनने केलं होतं. wasim jaffer trolled kevin pietersen पीटरसनच्या या ट्वीटवर वसीम जाफरने प्रतिक्रिया दिली. जाफरने केन विलियमसनचा फोटो पोस्ट केला. 'मग आम्ही काय बुर्ज खलिफा बघायला आलो का?' असं कॅप्शन जाफरने या फोटोला दिलं. केन विलियमसनने सेमी फायनल जिंकल्यानंतर मिचेलचं कौतुक केलं. 'दबाव असणाऱ्या या सामन्यात मिचेलने उत्कृष्ट बॅटिंग केली. टी-20 क्रिकेट छोट्या अंतराचा खेळ आहे. अनेकवेळा छोट्या-छोट्या गोष्टींमुळे मोठा फरक पडतो,' अशी प्रतिक्रिया केन विलियमसनने दिली.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: T20 world cup

    पुढील बातम्या