मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Hardik Pandya चा स्कॅन रिपोर्ट आला समोर, न्यूझीलंडविरुद्ध गोलंदाजीसाठी पांड्या तयार?

Hardik Pandya चा स्कॅन रिपोर्ट आला समोर, न्यूझीलंडविरुद्ध गोलंदाजीसाठी पांड्या तयार?

Hardik Pandya

Hardik Pandya

टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup ) स्पर्धेत टीम इंडियाचा पुढील सामना 31 ऑक्टोबरला न्यूझीलंडशी होणार आहे. दरम्यान, जायबंदी झालेल्या हार्दिक पांड्याचा(Hardik Pandya Injury) दुखापतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

  • Published by:  Dhanshri Otari

दुबई, 26 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup ) स्पर्धेत टीम इंडियाचा पुढील सामना 31 ऑक्टोबरला न्यूझीलंडशी होणार आहे. दरम्यान, जायबंदी झालेल्या हार्दिक पांड्याचा(Hardik Pandya Injury) दुखापतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

पाकिस्तानसोबत झालेल्या सामन्यात अष्टपैलू खेळडू हार्दिक पांड्याच्या उजव्या खांद्याला दुखापत झाल्याने त्याला स्कॅनसाठी रुग्णालयात नेण्यात आले होते. दरम्यान, त्याचा स्कॅन रिपोर्ट समोर आला असून, त्याची प्रकृती ठीक आहे. दुखापतग्रस्त झाल्यानंतर त्याचा स्कॅन करण्यात आला होता. कारण संघ व्यवस्थापनाला या खेळाडूबाबत कोणतीही हयगय करायची नव्हती.

हार्दिक पांड्या (Hardik Pandya) गोलंदाजी करत नाही हा संघासाठी चिंतेचा विषय होताच. शिवाय तो लवकरच बरा होईल आणि या विश्वचषकात गोलंदाजी करताना दिसेल अशी अपेक्षा होती. पण पाकिस्तानविरुद्ध सामन्यात फलंदाजी करताना त्याच्या उजव्या खांद्याला दुखापत (Shoulder Injury) झाली. फलंदाजी करताना चेंडू त्याच्या उजव्या खांद्याला लागला. सावधगिरी बाळगण्यासाठी त्याला लगेच रुग्णालयात नेण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.

भारतीय डावात पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीचा (Shaheen Afridi) वेगवान चेंडू खांद्याला लागल्यानंतर पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध दुसऱ्या डावात हार्दिक फिल्डिंगसाठी मैदानात उतरला नाही. ईशान किशन त्याच्या जागी क्षेत्ररक्षण करताना दिसला. भारताने फलंदाजी करून 151/7 धावसंख्येत हार्दिक आठ चेंडूत 11 धावाच करू शकला.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही त्याचा फलंदाज म्हणून संघात समावेश करण्यात आला होता. पंड्याचा पाकिस्तानविरुद्धचा सामना अतिशय खास होता, कारण हा त्याचा 50 वा टी -20 सामना होता. भारताला आता पुढील सामना 31 ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध खेळायचा आहे. त्याची प्रकृती ठीक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तो या सामन्यात तरी मैदानात गोलंदाजीसाठी उतरेल का? असा सवाल उपस्थित होतं आहे.

टीम इंडियाला आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदा पराभव पत्करावा लागला आहे. भारताने दिलेल्या 152 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानने कर्णधार बाबर आजम आणि मोहम्मद रिझवानच्या दणकेबाज दीडशतकी भागीदारीच्या जोरावर 10 विकेटने जबरदस्त विजय मिळवला. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात पाकिस्तानने पहिल्यांदा भारतीय संघावर मात केली आहे.

First published:

Tags: Hardik pandya, T20 cricket, T20 league, T20 world cup