मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup : IND vs NAM मॅचमध्येच विराट धक्का देणार, या खेळाडूकडे सोपवणार कॅप्टन्सी!

T20 World Cup : IND vs NAM मॅचमध्येच विराट धक्का देणार, या खेळाडूकडे सोपवणार कॅप्टन्सी!

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाची (Team India) कामगिरी निराशाजनक झाली आहे. या वर्ल्ड कपमधला टीम इंडियाचा अखेरचा सामना सोमवारी नामिबियाविरुद्ध (India vs Namibia) होणार आहे. हा सामना विराट कोहलीसाठी (Virat Kohli) टी-20 टीमचा कॅप्टन म्हणून अखेरचा असेल.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

दुबई, 8 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाची (Team India) कामगिरी निराशाजनक झाली आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या दारूण पराभवानंतर भारताने अफगाणिस्तान आणि स्कॉटलंडला धूळ चारली, पण तरीही टीम इंडियाचं सेमी फायनलला पोहोचण्याचं स्वप्न भंगलं. या वर्ल्ड कपमधला टीम इंडियाचा अखेरचा सामना सोमवारी नामिबियाविरुद्ध (India vs Namibia) होणार आहे. हा सामना विराट कोहलीसाठी (Virat Kohli) टी-20 टीमचा कॅप्टन म्हणून अखेरचा असेल. वर्ल्ड कपनंतर आपण टी-20 फॉरमॅटची कॅप्टन्सी सोडणार असल्याचं विराट कोहलीने स्पर्धा सुरू व्हायच्या आधीच जाहीर केलं आहे. विराटनंतर टीम इंडियाचा कर्णधार कोण होणार? याबाबत अजून कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. भारताचे माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी मात्र विराट कोहलीने नामिबियाविरुद्धच्या मॅचमध्येच रोहित शर्माला (Rohit Sharma) कॅप्टन्सी सोपवावी, असा सल्ला दिला आहे.

दफा न्यूजशी बोलताना मांजरेकर म्हणाले, 'जर विराट कोहलीला नवा ट्रेण्ड सेट करायचा असेल, तर तो नामिबियाविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माकडे टीमचं नेतृत्व देऊ शकतो. यामुळे रोहित शर्माला शेवटच्या मॅचमध्ये आराम मिळणार नाही आणि त्याला कर्णधार म्हणून खेळावं लागेल.'

विराट कोहलीने 2017 साली पहिल्यांदा भारताच्या टी-20 टीमची कॅप्टन्सी केली होती. नामिबियाविरुद्ध कर्णधार म्हणून विराटचा हा 50 वा आंतरराष्ट्रीय टी-20 सामना असेल. विराटच्या नेतृत्वात भारताने 29 मॅच जिंकल्या आहेत. विराटच्या नेतृत्वात भारताला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही. रोहित शर्माने आपल्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सना सर्वाधिक 5 वेळा आयसीसी ट्रॉफी जिंकवून दिल्या आहेत.

दुसरीकडे टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासाठीही ही अखेरची मॅच आहे. या सामन्यानंतर रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपत आहे. राहुल द्रविडची टीम इंडियाचा मुख्य कोच म्हणून नियुक्ती झाली आहे. 17 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंड सीरिजपासून राहुल द्रविड नव्या भूमिकेत दिसेल. राहुल द्रविड कोच असताना भारताने एकदा अंडर-19 वर्ल्ड कप जिंकला, तर एकदा अंडर-19 वर्ल्ड कप फायनलमध्ये स्थान मिळवलं होतं. राहुल द्रविड आणि रोहित शर्माची जोडी लवकरच भारताला आयसीसी ट्रॉफी जिंकवून देईल, असा विश्वास गौतम गंभीरनेही व्यक्त केला आहे.

First published:

Tags: Rohit sharma, T20 world cup, Team india, Virat kohli