दुबई, 20 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध (India vs Pakistan) 24 ऑक्टोबरला होणार आहे. याआधी भारतीय टीमने इंग्लंडविरुद्धच्या (India vs England Practice Match) सराव सामन्यात दणदणीत विजय मिळवला, तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध (India vs Australia) उत्कृष्ट बॉलिंग केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात पहिले बॉलिंग करणाऱ्या भारताने पॉवर प्लेमध्येच तीन धक्के दिले. आर.अश्विनने (R Ashwin) लागोपाठ दोन बॉलला डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि मिचेल मार्शला (Mitchell Marsh) आऊट केलं, तर रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) एरॉन फिंचला माघारी धाडलं.
या सामन्यात विराट कोहलीऐवजी रोहित शर्मा (Rohit Sharma) भारतीय टीमचं नेतृत्व करत आहे. सराव सामना असल्यामुळे दोन्ही टीमना जास्त खेळाडू वापरण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे विराट (Virat Kohli) या सामन्यात खेळत नसला तरी त्याला रोहित शर्माने बॉलिंग दिली. रोहितच्या या निर्णयामुळे विराट आता पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही बॉलिंग करणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) दुखापतीमुळे टीम इंडियाला सहाव्या बॉलरची चिंता भेडसावत आहे. रोहित शर्माने टॉसवेळीही सहावा बॉलर गरजेचा असल्याचं सांगितलं. 'आम्हाला बॉलिंगसाठी सहावा पर्याय हवा आहे. हार्दिक फिट होत आहे, पण त्याला बॉलिंगसाठी तयार व्हायला वेळ लागेल. त्याने बॉलिंगला सुरुवात केलेली नाही, पण स्पर्धा सुरू व्हायच्या आधी तो बॉलिंगला सुरुवात करेल. आमची बॉलिंग उत्कृष्ट आहे, पण तुम्हाला पर्याय म्हणून सहावा बॉलर गरजेचा आहे,' असं रोहित शर्मा म्हणाला.
...म्हणून Rohit Sharma आहे बेस्ट, कॅप्टन होताच ऑस्ट्रेलियाला दिले एकामागे एक धक्के!
विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात दोन ओव्हर बॉलिंग केली, यात त्याने 12 रन दिल्या, पण त्याला एकही विकेट मिळाली नाही. एमएस धोनी मेंटर आणि रोहित शर्मा कॅप्टन होताच टीम इंडियाच्या रणनितीमधला हा बदल पाहायला मिळाला. विराट कोहली बहुतेकवेळा पाच बॉलर घेऊन खेळण्यासाठी उत्सुक असतो, पण रोहित शर्मा आणि एमएस धोनी बॉलिंगला जास्त पर्याय घेऊन खेळतात. एमएस धोनी कॅप्टन असतानाही तो युवराज, सेहवाग, सचिन यांच्याकडून बॉलिंग करून घ्यायचा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India vs Pakistan, T20 world cup