मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup : टीम इंडियाचे हे 6 खेळाडू आज Bio Bubble मध्ये प्रवेश करणार!

T20 World Cup : टीम इंडियाचे हे 6 खेळाडू आज Bio Bubble मध्ये प्रवेश करणार!

टी-20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup) टीम इंडियाचे (Team India) 6 खेळाडू आज बायो-बबलमध्ये प्रवेश करणार आहेत. हे सगळे खेळाडू आयपीएलमध्ये (IPL 2021) मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) खेळलेले आहेत.

  • Published by:  Shreyas

दुबई, 12 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup) टीम इंडियाचे (Team India) 6 खेळाडू आज बायो-बबलमध्ये प्रवेश करणार आहेत. हे सगळे खेळाडू आयपीएलमध्ये (IPL 2021) मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) खेळलेले आहेत. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, राहुल चहर आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे. आज हे सगळे खेळाडू दुबईमध्ये टीम इंडियाच्या हॉटेलमध्ये एण्ट्री करतील. असं असलं तरी सगळ्यांचं लक्ष ऑलराऊंडर हार्दिक पांड्यावर (Hardik Pandya) असणार आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा पहिला सामना 24 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध (India vs Pakistan) होणार आहे, त्याआधी टीमला हार्दिकबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार मंगळवारी मुंबई इंडियन्सचे खेळाडू Th8 पाम हॉटेलमध्ये जातील. हार्दिक टीम इंडियासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे, आमचं लक्ष हार्दिकच्या फिटनेसकडे असेल, असं टीम मॅनेजमेंटच्या सूत्रांनी सांगितलं.

हार्दिकच्या फिटनेसबाबत विचारलं असता, 'हा निर्णय टीम मॅनेजमेंट घेईल. धोनी टीमचा मेंटर झाल्यानंतर टीमसाठी जे योग्य असेल ते होईल. भारताच्या मधल्या फळीला मोठ्या मॅच खेळण्याचा अनुभव नाही, खासकरून भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज मॅचमध्ये,' असं सूत्रांनी सांगितलं.

हार्दिकने पाकिस्तानविरुद्धच्या मोठ्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये त्याने 43 बॉलमध्ये 76 रन केल्या, याशिवाय 2019 वर्ल्ड कपमध्ये त्याने 19 बॉलमध्ये 26 रन केले आणि दोन विकेटही मिळवल्या होत्या.

हार्दिक एक्स फॅक्टर

'जरी हार्दिकची बॉलिंग चिंतेचा विषय असला तरी त्याच्यामध्ये एक्स फॅक्टर आहे. तो बॅटनेही मॅच पलटवू शकतो. मागच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात आपण बघितलं होतं. मोठ्या स्पर्धांसाठी अशा खेळाडूंची गरज असते. जो एकट्याच्या जीवावर मॅच जिंकवून देऊ शकतो. मला वाटतं तो टीममध्ये असेल आणि फिजियो तो बॉलिंग करू शकेल, यासाठी प्रयत्न करेल,' असं टीम मॅनेजमेंटमधल्या सूत्राला वाटतं.

टी-20 वर्ल्ड कपला 17 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. ओमान आणि पपुआ न्यू गिनी यांच्यात पहिला सामना होणार आहे. याचदिवशी बांगलादेश आणि स्कॉटलंड यांच्यातही मुकाबला होईल. सुपर-12 राऊंडची सुरुवात 23 ऑक्टोबरपासून होणार आहे.

First published:

Tags: IPL 2021, Mumbai Indians, T20 world cup, Team india