Home /News /sport /

T20 World Cup पूर्वी हिटमॅन रोहितने Hardik Pandyaला दिला इशारा

T20 World Cup पूर्वी हिटमॅन रोहितने Hardik Pandyaला दिला इशारा

T20 World Cup पूर्वी हिटमॅन रोहितने Hardik Pandyaला दिला इशारा

T20 World Cup पूर्वी हिटमॅन रोहितने Hardik Pandyaला दिला इशारा

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) भारताविरुद्धच्या महामुकाबल्याआधी टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma)अष्टपैलू हार्दिक पांड्यासाठी(Hardik Pandya) चेतावणी जारी केली आहे.

    नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर: टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) भारताविरुद्धच्या महामुकाबल्याआधी टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma)अष्टपैलू हार्दिक पांड्यासाठी(Hardik Pandya) चेतावणी जारी केली आहे. भारतीय संघाची तयारी झाली असली तरी एक समस्या अजूनही कायम आहे आणि ती म्हणजे हार्दिक पांड्या. दुसऱ्या सराव सामन्यातही तो गोलंदाजी करू शकला नाही. अशास्थितीत रोहितने पांड्याने पाकिस्तानविरुद्ध सामन्यापूर्वी गोलंदाजीला सुरुवात करावी. असा इशारा दिला आहे. वार्मअप मॅचदरम्यान रोहितने पांड्याच्या खेळीवर आपले मत मांडले. ''हार्दिक पांड्या गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे, पण त्याने अजून गोलंदाजी सुरू केली नाही. मात्र, स्पर्धा सुरू होईपर्यंत तो पूर्णपणे तयार झाला पाहिजे'' असे सांगत पांड्याला रोहितने इशारा दिला. पाकिस्तानमध्ये 'बळीचा बकरा' शोधला जातो, पाकच्या माजी खेळाडूने PCB वर ओढले ताशेरे तसेच, आमच्या गोलंदाजी संघात उत्तम गोलंदाज आहेत, तरीही आम्हाला सहाव्या गोलंदाजाची गरज असेल. आम्हाला प्रत्येक समीकरणाची चिंता नाही, पण विविधता असणे संघाला मदत करते. असे मत रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या वार्मअप मॅचदरम्यान व्यक्त केले. पांड्याला टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाच्या 15 सदस्यीय संघात अष्टपैलू म्हणून समाविष्ट करण्यात आले असले तरी, 28 वर्षीय अष्टपैलूने आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात मुंबई इंडियन्ससाठी त्याने एकही षटक टाकले नाही. अश्विननं वाढवलं टीम इंडियाचं टेन्शन, विराटला घ्यावी लागणार धोनीची मदत टीम इंडिया 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात करणार आहे. भारताने सोमवारी पहिल्या वार्मअप मॅचमध्ये इंग्लंडचा सात गडी राखून पराभव केला आणि नंतर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 9 गडी राखून पराभूत केले. या सामन्यात रोहितने नाबाद 60 धावा केल्या, तर सलामीवीर केएल राहुलने 39 धावा आणि सूर्यकुमार यादवने नाबाद 38 धावा केल्या. तसेच हार्दिक पंड्याने 8 चेंडूत 14 धावा करून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Hardik pandya, Rohit sharma, T20 cricket, T20 league, T20 world cup

    पुढील बातम्या