मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20WC: 'खेळाची समज अजूनही अनेक प्रकारे मागासलेली' पुनरागमनानंतर R.ashwin ने टीकाकारांना दिले सडेतोड उत्तर

T20WC: 'खेळाची समज अजूनही अनेक प्रकारे मागासलेली' पुनरागमनानंतर R.ashwin ने टीकाकारांना दिले सडेतोड उत्तर

R.ashwin

R.ashwin

अफगाणिस्तानच्या(INDvsAFG) विजयानंतर आर अश्विनने(R.ashwin) गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियावर टीकेची झोड उठवणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

नवी दिल्ली, 5 नोव्हेंबर: टी20 वर्ल्ड कप (T2o World Cup 2021) मध्ये टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. त्यामुळे क्रिकेट प्रेमिंनी टीम इंडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, अफगानिस्तान संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाने 66 धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात टीम इंडियाकडून आर अश्विनने (R.ashwin) गोलंदाजी करताना अप्रतिम कामगिरी केली होती. सामना झाल्यानंतर त्याने आपल्या पुनरागमनाविषयी आणि टीम इंडियावर होणाऱ्या टीकेवर मोठी प्रतिक्रीया दिली आहे.

टी20 वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यात वरूण चक्रवर्तीला संधी देण्यात आली होती. या दोन्ही सामन्यात त्याला एकही गडी बाद करता आला नव्हता. त्यामुळे त्याला बाहेर करून आर अश्विनला संधी देण्याची मागणी जोर धरू लागली होती. आर अश्विनला संधी मिळताच त्याने संधीचे सोने केले आणि अफगानिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यात 2 महत्वाचे गडी बाद केले.

दरम्यान, अश्विनने टीम इंडियावर टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. 'बळी टिपण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. आणि हे असे मुळीच नाहीये जे फक्त क्रिकेट सामना सुरू असताना घडते. मला कधी कधी या खेळावर मत मांडणाऱ्या तज्ञांचे वाईट वाटते. मी 2007-08 पासून क्रिकेटचे हे स्वरूप खेळतोय. हा खेळ खूप काही शिकवतो. तसेच या खेळात अनेक बदल देखील आले आहेत. मला वाटते की खेळाची समज अजूनही अनेक प्रकारे मागासलेली आहे.' असे मत अश्विनने यावेळी व्यक्त केले.

तसेच तो पुढे म्हणाला, अशी काही ठिकाणं आहेत जिथे तुम्ही टेस्ट सिरीजमध्ये गोलंदाजी करू शकता. परंतु टी -20 क्रिकेटमध्ये ते संभव नाही. एखाद्याची विकेट घेणं सोपं नसतं. तज्ञांनुसार, गोलंदाजीमध्ये देखील भागीदारी असते. जर मागचे षटक चांगले गेले असेल, तर पुढच्या षटकात गडी बाद करण्याची शक्यता आणखी वाढते.

अफगाणिस्तानच्या सामन्याअगोदर अश्विनने 2017 मध्ये भारतासाठी शेवटचा टी-20 सामना खेळला होता. चार वर्षांनंतर टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या अश्विनने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातून पुन्हा एकदा आपलं कर्तृत्व सिद्ध करुन दाखवले.

अश्विनने विश्वचषकातील सराव सामन्यांमध्येही चमकदार कामगिरी केली होती. इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात त्याने 4 षटकांत 23 धावा दिल्या मात्र त्याला विकेट घेता आली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने 2 षटके टाकली आणि आठ धावांत 2 गडी बाद केले.

First published:
top videos

    Tags: R ashwin, T20 cricket, T20 league, T20 world cup