मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup : ...म्हणून मी विराटवर जळतो, अश्विनने केला खुलासा, VIDEO

T20 World Cup : ...म्हणून मी विराटवर जळतो, अश्विनने केला खुलासा, VIDEO

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) आज टीम इंडियाचा सामना स्कॉटलंडविरुद्ध (India vs Scotland) होणार आहे. कर्णधार विराट कोहली (Virat Kohli Birthday) याचा आज वाढदिवस आहे.

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) आज टीम इंडियाचा सामना स्कॉटलंडविरुद्ध (India vs Scotland) होणार आहे. कर्णधार विराट कोहली (Virat Kohli Birthday) याचा आज वाढदिवस आहे.

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) आज टीम इंडियाचा सामना स्कॉटलंडविरुद्ध (India vs Scotland) होणार आहे. कर्णधार विराट कोहली (Virat Kohli Birthday) याचा आज वाढदिवस आहे.

दुबई, 5 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाची (Team India) कामगिरी निराशाजनक झाली आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात दारूण पराभव झाल्यानंतर भारताने अफगाणिस्तानविरुद्ध 66 रननी दणदणीत विजय मिळवला. आता आज टीम इंडियाचा सामना स्कॉटलंडविरुद्ध (India vs Scotland) होणार आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli Birthday) याचा आज वाढदिवस आहे, त्यामुळे या सामन्यात मोठा विजय मिळवून देऊन कॅप्टनला बर्थ डे गिफ्ट देण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.

विराट कोहलीला वाढदिवसानिमित्त जगभरातल्या क्रिकेटपटूंनी शुभेच्छा दिल्या आहेत, यात टीम इंडियाचा ऑफ स्पिनर आर.अश्विनही (R Ashwin) आहे. अश्विनने टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीविषयी आपले विचार मांडले. स्टार स्पोर्ट्सने त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून याचा एक व्हिडिओ शेयर केला आहे.

'विराट कोहली लाल बॉलच्या क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कर्णधार आहे. तो मन लावून खेळतो हे मी त्याच्याबरोबर खेळल्यामुळे सांगू शकतो. तो एवढी उर्जा कुठून आणतो, हे त्याच्याकडे बघून मला कळत नाही. मैदानात आणि मैदानाबाहेर विराटची ही उर्जा पाहून मी जळतो,' असं अश्विन या व्हिडिओमध्ये म्हणाला आहे. आर.अश्विनने तब्बल साडेचार वर्षांनंतर मर्यादित ओव्हरच्या क्रिकेटमध्ये टीम इंडियात पुनरागमन केलं आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या पुनरागमनाच्या सामन्यात अश्विनने दिमाखदार कामगिरी केली. 2017 नंतर अश्विन भारताकडून वनडे आणि टी-20 खेळला नव्हता.

कर्णधार म्हणून विराट कोहलीची ही अखेरची स्पर्धा आहे. टी-20 वर्ल्ड कपनंतर विराट या फॉरमॅटचं नेतृत्व सोडणार आहे. वर्ल्ड कपच्या आधीच विराटने याची घोषणा केली होती. विराट कोहलीला त्याच्या नेतृत्वात भारताला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकवता आली नाही. यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्येही टीम इंडियाचं सेमी फायनलला पोहोचणं धूसर आहे.

T20 World Cup : फक्त ही दोन कामं झाली तर टीम इंडिया पोहोचणार सेमी फायनलमध्ये!

First published:
top videos

    Tags: R ashwin, T20 world cup, Virat kohli