Home /News /sport /

T20 World Cup 2021 : विराटचा दे धक्का! अश्विनचं 4 वर्षांनी कमबॅक

T20 World Cup 2021 : विराटचा दे धक्का! अश्विनचं 4 वर्षांनी कमबॅक

टी-20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup) टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे. या टीमची घोषणा होताच विराटने (Virat Kohli) विरोधी टीमना डबल धक्के दिले आहेत.

    मुंबई, 8 सप्टेंबर : टी-20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup) टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे. या टीमची घोषणा होताच विराटने (Virat Kohli) विरोधी टीमना डबल धक्के दिले आहेत. भारताचा दिग्गज ऑफ स्पिनर आर.अश्विन (R Ashwin) याचं भारताच्या मर्यादित ओव्हरच्या टीममध्ये तब्बल 4 वर्षांनी पुनरागमन झालं आहे. याशिवाय एमएस धोनीची (MS Dhoni) मेंटर म्हणून निवड करण्यात आली आहे. 2017 नंतर अश्विन टी-20 आणि वनडे खेळला नव्हता. चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 च्या फायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर भारताने अश्विन आणि जडेजा (Ravindra Jadeja) या जोडीला बाहेर करत युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) संधी दिली. या दोघांनीही मिळालेल्या या संधीचं सोनं केलं, पण मागच्या वर्षभरात कुलदीप आणि चहलचा फॉर्म कमालीचा ढासळला, त्यामुळे त्याला टीमबाहेर जावं लागलं आहे. आश्चर्यकारक म्हणजे टी-20 वर्ल्ड कपच्या टीममध्ये युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांना संधी देण्यात आलेली नाही. तर अश्विन आणि जडेजा हे दोघं टीममध्ये आहेत. या दोन स्पिनरशिवाय वरुण चक्रवर्ती, राहुल चहर आणि अक्षर पटेल यांनाही संधी देण्यात आली आहे. भारतीय टीम विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर. अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी राखीव खेळाडू : श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: R ashwin, T20 world cup

    पुढील बातम्या